'या' कारणामुळे दीपिका आणि रणवीर करणार 15 नोव्हेंबरला लग्न
दीपिका-रणवीर (Photo Credits : Instagram)

बॉलिवूडमधील सर्वात कूल- डॅशिंग म्हणून ओळख असलेला अभिनेता रणवीर सिंह हा लवकरच अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याशी 15 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. तर कालच या दोघांनी त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका हे दोघे गेली पाच वर्षे त्यांचे प्रेमाचे नाते जपत आहेत. मात्र आता या दोघांच्या चाहत्यांमध्ये 15 नोव्हेंबर हीच का लग्नाची तारीख ठरविली आहे असा प्रश्न त्यांना पडला आहे. तसेच या दिवसाचे काहीतरी खास महत्व असल्याशिवाय ही तारीख ठरविली असेल असे तर्कवितर्क सुद्धा काढले जात आहेत.तर या दोघांचे प्रेम प्रकरण संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट रामलीला या चित्रपटापासून चालू झाले आहे.  या दोघांनी आता पर्यंत भन्साळी यांचे चार चित्रपट एकत्र केले आहेत.

मात्र या 15 नोव्हेंबरच गुढ गुपित हे 'रामलीला' चित्रपटाशी संबंधित आहे असं ही समजले जात आहे.  15 नोव्हेंबर 2013  मध्ये रामलीला प्रदर्शित झाला होता. तसेच या वर्षी रामलीला चित्रपटाला 5 वर्षसुद्धा पूर्ण होत आहेत. त्यामुळेच प्रेमाची पहिली भेट आणि आठवण म्हणून ही तारीख निवडली असणार अशी चर्चा आता कालपासून सर्वांमध्ये रंगत आहेत.