रणवीर सिंग - दीपिका पादुकोण लग्नपत्रिकेतील  या '2' चूकांमुळे सोशल मीडियात झाले ट्रोल !
दीपिका-रणवीरचा शाही विवाहसोहळा photo Credit : Instagram

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील सुपरहीट कपल आता प्रत्यक्ष आयुष्यातही लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज झाली आहे. रामलीला, बाजीराव - मस्तानी आणि पद्मावत असे तीन ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतर यांच्यामधील नात्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करत त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर शेअर केली आहे.

बॉलिवूडमधील कलाकारांसोबतच रणवीर आणि दीपिकाच्या चाहत्यांनी त्यांच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र काहींना दीपिका आणि रणवीरच्या लग्नपत्रिकेमध्ये चूकाही आढळल्या आहेत. सध्या अनेक कारणांमुळे रणवीर आणि दीपिका ही जोडी चर्चेमध्ये आहे. हे दोघे विराट आणि अनुष्काप्रमाणे इटलीमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

 

सोशल मीडियामध्ये शेअर केलेल्या पत्रिकेमध्ये दीपिकाचं नावं व्याकरणदृष्ट्या चूकीचं लिहलं आहे तर लग्न 14 आणि 15 नोव्हेंबरला संपन्न होणार असल्याचा उल्लेख असल्याने काहींनी त्यावरूनही दीपिका आणि रणवीरला ट्रोल केलं आहे.  दीपिका-रणवीरच्या लग्नाचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल !