दीपिका रणवीरने केली लग्नाची घोषणा ; 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात
रणवीर सिंग और दीपिका पादुकोण (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगच्या लग्नाची वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चा आहे. या दोघांच्या लग्नाच्या अनेक तारखा समोर येत होत्या. पण त्या अफवा असल्याचे सिद्ध झाले. आता मात्र सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण जवळ आला आहे. तो म्हणजे दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तारीख ठरली आहे आणि याची घोषणा खुद्द रणवीर-दीपिकाने केली आहे.

दीपिकाने ट्विटरवर एक पत्रिका शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, "आम्हाला तुम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आमचं लग्न १४ आणि १५ नोव्हेंबरला ठरलं आहे. इतक्या वर्षात तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि आपुलकी दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आमच्या सुरु होणाऱ्या नव्या प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या सुंदर नात्यासाठी आम्ही तुमच्या आशीर्वादांची इच्छा करतो. खूप सारे प्रेम- दीपिका आणि रणवीर."

दीपिकासोबत रणवीरने देखील लग्नाची तारीख जाहीर केली आहे. रणवीरने हाच मेसेज इंस्टग्रामवर शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नावर अनेक प्रश्न केले जात होते. पण दोघांनी याबद्दल जाहीरपणे बोलणे टाळले होते. आता मात्र या पोस्टमुळे अनेक प्रश्नांना उत्तर मिळाले आहे.