Drugs Case: मिका सिंगचा Aryan Khan ला पांठिबा, ट्विटकरुन दाखवले आपले समर्थन
Mikha Sing & Srk (Photo Credit - Facebook)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरील अंमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटक झाली. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. मुलाला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आर्यनला पाठिंबा दिला आहे. आता गायक मिका सिंगनेही या बाबत आपला संताप व्यक्त केला आहे. (हे ही वाचा Cruise Ship Drug Case: मुंबई उच्च न्यायालयात आज Aryan Khan, Arbaaz Merchant आणि Moonmoon Dhamecha च्या जामीना वर सुनावणी.)

चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे. सोमवीरी ट्विट करुन त्यांनी असे सांगितले आहे की शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत, चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक कार्यासाठी तो नेहमीच मदत करत असतो. आणि आज त्याच इंडस्ट्रीमधील लोक त्याच्या कठीण काळात मौन बाळगून आहेत. हे किती लज्जास्पद आहे या आशयाचे ट्वीट संजय गुप्ता यांनी केले आहे.

मिकाने संजय गुप्ता यांचे ट्वीट रिट्वीट केले आहे. ‘तुमचे अगदी बरोबर आहे. सर्वजण काय सुरु आहे हे फक्त पाहात आहेत, पण एकही शब्द बोलत नाहीत. माझा शाहरुख खानला पाठिंबा आहे. आर्यन खानला जामीन मिळायला हवा. मला असे वाटते इंडस्ट्रीमधील प्रत्येकाची मुले एकदा तरी तुरुंगात जातील, तेव्हाच सर्वजण एकत्र येतील’ या आशयाचे ट्वीट मिका सिंगने केले आहे.

ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आर्यन खान मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये गजाआड आहे. आर्यन केसवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळत त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर शाहरुख खान आणि आर्यन खानचे वकील आर्यनला लवकरात लवकर जामीन मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.