अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला सोमवारी मुंबईमधील वांद्रे परिसरातील लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8 ऑगस्ट दिवशी श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून संजय दत्त याला लीलवतीमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याने काही तासातच त्याला डिस्जार्ज देण्यात आला होता. यातच त्याने आणखी एक ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी मी कामापासून ब्रेक घेत आहे. महत्वाचे म्हणजे, माझ्या तब्येतीविषयी कोणतीही अफवा पसरवू नका, असे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.
"नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका, असे आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईल", असे ट्विट संजय दत्तने केले आहे. हे देखील वाचा- Rahat Indori Dies of Covid-19: प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी यांचा कोरोनामुळे मृत्यू
संजत दत्त याचे ट्वीट-
— Sanjay Dutt (@duttsanjay) August 11, 2020
संजय दत्त लवकरच सडक 2 मध्ये झळकणार आहे. या सिनेमामध्ये आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूत असून या सिनेमाचा डिजिटल प्रिमियर होणार आहे. मात्र, संजत दत्त हा वैद्यकीय तपासणीसाठी ब्रेक घेणार असल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.