DMDK पक्षाचे संस्थापक आणि दाक्षिणात्य अभिनेता विजयकांत ची प्रकृती बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू
विजयकांत (Photo Credits: Twitter)

डीएमडीके (DMDK) पक्षाचे संस्थापक आणि दाक्षिणात्य अभिनेता विजयकांत (Vijayakanth) च्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे, ज्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, विजयकांतला श्वास घेण्यात त्रास होत होता, त्यानंतर त्याला त्याच्या जवळच्या मित्रांनी रुग्णालयात नेले. देसिया मुरपोक्कू द्रविड़ कड़गम पक्षाचे अध्यक्षला गेल्या वर्षी कोविड संसर्ग झाला होता. परंतु, त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.

माध्यमात देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे तीन वाजता अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला चेन्नईच्या मोईत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्याची तब्येतही नाजूक असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात, डीएमडीकेने आपले अधिकृत विधान प्रसिद्ध केलं आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितलं आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. यासह पक्षाने त्यांच्याशी संबंधित कोणत्याही अफवाकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. (वाचा - The Family Man 2 Trailer: मनोज वाजपेयी च्या बहुप्रतिक्षित वेब सिरिज 'द फॅमिली मॅन 2' चा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ)

पक्षाचे म्हणणे आहे की विजयकांतला रूटीन तपासणीसाठी रूग्णालयात नेण्यात आले असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. अभिनेत्याच्या तब्येतीविषयीच्या बातमी ऐकल्यानंतर त्याचे सर्व चाहते त्याच्या रिकव्हसाठी प्रार्थना करत आहेत.