Mahabharat Web Series: महाभारताची कथा तुम्ही टीव्हीवर अनेकदा पाहिली असेल. बीआर चोप्रा यांचा 'महाभारत' (Mahabharat) हा टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो आहे. याशिवाय 2013 मध्ये स्टार प्लसवर महाभारत टेलिकास्ट झाला होता. त्यालाही चांगलीच पसंती मिळाली होती. आता त्याची कथा ओटीटीवर दाखवण्यासाठी सज्ज आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) ने शुक्रवारी अमेरिकेत सुरू असलेल्या D23 एक्स्पोमध्ये एका मोठ्या भारतीय प्रकल्पाची घोषणा केली. यात महाभारतावरील वेब सिरीजचाही समावेश आहे. महाभारत वेब सीरिजची निर्मिती मधु मंटेना, मायथोवर्स स्टुडिओ आणि अल्लू एंटरटेनमेंट करणार आहेत.
वेब सीरिजची निर्मिती करणाऱ्या मधु मंतेना यांनी एक निवेदन जारी केले की, 'असे म्हटले जाते की, मानवजातीला जे काही अनुभव येत असतील, एक ना एक भावनिक संघर्ष महाभारताच्या कथा आणि पात्रांमध्ये दिसून येतो. डिस्ने प्लस हॉटस्टारद्वारा मिळालेल्या ऑफरमुळे आम्हाला खूप आनंद होत आहे.” (हेही वाचा - Kangana Ranuat On Bramhastra: अभिनेत्री कंगणा रनौतकडून ऐका ब्रम्हास्त्र सिनेमाचा रिव्ह्यू, कणखर शब्दात घेतला दिग्दर्शकासह कलाकारांचा घेतला समाचार)
The greatest epic ever written- retold at a scale never seen before! Stay tuned for an ethereal spectacle- #Mahabharat, is coming soon.#HotstarSpecials #Mahabharat #MahabharatOnHotstar @alluents & @MythoStudios pic.twitter.com/9ysLsYeDCx
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) September 10, 2022
डिस्ने प्लस हॉट स्टारचे कंटेंट हेड द्वेषी गौरव बॅनर्जी म्हणाले, “कोट्यवधी लोक आहेत ज्यांना ही कथा कोणत्या ना कोणत्या प्रकारे माहीत आहे. माझ्या देशातील बहुतेक लोकांनी त्यांच्या लहानपणी त्यांच्या आजी-आजोबांकडून या कथा ऐकल्या आहेत. आणखी करोडो लोक आहेत ज्यांना ते काय गमावत आहेत याची माहिती नाही. पुढील वर्षी ही अविश्वसनीय कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत नेणे ही एक सौभाग्याची गोष्ट असणार आहे.”