Pradeep Sarkar | Twitter

बॉलिवूड मधील प्रसिद्ध फिल्ममेकर प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज 24 मार्च दिवशी पहाटे 3.30 च्या सुमारास त्यांची प्राणाज्योत मालवली आहे. बॉलिवूड मध्ये अजय देवगण, मनोज बाजपेयी सह अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान प्रदीप सरकार यांनी परिणीती, लागा चुनरी मै दाग, मर्दानी, हेलिकॉप्टर इला सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, प्रदीप सरकार मागील काही दिवस डायलिसिसवर होते. त्यांच्या शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण अचानक खालावले. हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास त्यांच्यावर मुंबईतील सांताक्रुझ मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

अजय देवगण

मनोज बाजपेयी

प्रदीप सरकार यांच्या करियरची सुरूवात विधू विनोद चोपडा प्रोडक्शन मध्ये झाली. 17 वर्ष त्यांनी मेन स्ट्रिम जाहिरात क्षेत्रात काम केले. Creative Director - Art म्हणून त्यांची सुरूवात झाली होती.

काही दिवसांपूर्वीच अभिनेते सतिश कौशिक यांची देखील अकाली एक्झिट झाली आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तातून बॉलिवूड सावरत  असताना आता हा प्रदीप सरकार  यांच्या निधनाचा नवा डोंगर बॉलिवूडवर कोसळला आहे.