Nishikant Kamat Gets Hospitalised: दिग्दर्शक निशीकांत कामत याची प्रकृती खालावली; हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु
Nishikant Kamat (Photo Credit: Twitter)

'डोंबिवली फास्ट' या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या विश्वात पदार्पण करणाऱ्या निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांची प्रकृती खालावली आहे. हैदाराबाद (Hyderabad) येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. निशीकांत हा गेल्या काही दिवसांपासून यकृताच्या आजाराने त्रस्त होता. मात्र, पुन्हा एकदा त्याला हा त्रास जाणून लागला आहे. निशिकांत कामत यांच्यावर गेल्या 10 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. ज्यामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत चिंताजनक वातावरण पाहायला मिळाले. तसेच लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना संपूर्ण देशातून केली जात आहे.

दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशीकांत कामतने आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशीकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झाले. डोंबिवली फास्ट चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशीकांत कामतने खलनायकाची भूमिका केली आहे. निशीकांतचा दरबदर हा सिनेमा 2022 साली प्रेक्षकांच्या भेटीला येणे अपेक्षित आहे. हे देखील वाचा- Sanjay Dutt Diagnosed With Lung Cancer: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग; उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. मात्र, वर्ष 2020 हे सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी नुकसानदायक ठरले आहे. दरम्यान, सिनेसृष्टीने या वर्षात अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत. इमरान खान, ऋषी कपूर, सरोज खान, सुशांत सिंह राजपूत, राहत इंदौरी यांरख्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे.