Mission Mangal Song: प्रत्येक भारतीयाच्या नसानसात भिणेल 'दिल में मार्स है' गाणं प्रदर्शित
Mission Mangal Song (Photo Credits: YouTube)

'मिशन मंगळ' ही असंभव गोष्ट संभव करुन दाखवण्यात यशस्वी ठरलेला भारत देशाचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. या दमदार कामगिरीची आठवण करुन देणारा 'मिशन मंगल' (Mission Mangal) हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 'दिल में मार्स है' (Dil Mein Mars Hai) असे या गाण्याचे बोल आहेत. बेनी दयाल आणि विभा सराफ यांच्या आवाजातील हे भन्नाट गाणे लोक खूप पसंत करत आहे. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) या चित्रपटात दिसणार असून त्याच्या जोडीला विद्या बालन (Vidya Balan), तापसी पन्नू (Taapsee Pannu), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ह्या गाण्यामध्ये विद्या बालन एक वेगळ्याच रुपात पाहायला मिळत आहे.

तसेच अक्षय कुमार ने ही सिनेमाचे हे अफलातून गाणे आपल्या सोशल अकाउंटवरून शेअर करुन उत्तम टीमवर्क असेल तर त्या टीमचे स्वप्न नक्की पुर्ण होऊ शकते असे म्हटले आहे.

अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणे लिहिले असून अमित त्रिवेदी या गाण्याचे संगीतकार आहेत. जगन शक्ती हे मिशन मंगल या सिनमाचे दिग्दर्शक आहे. या सिनेमात शर्मन जोशी (Sharman Joshi), किर्ती कुल्हारी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

हेही वाचा- Mission Mangal Trailer: भारताला मंगळापर्यंत घेऊन जाण्याचा अवघड आणि अशक्य प्रवास उलघडणारा 'मिशन मंगल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित! (Watch Video)

15 ऑगस्टला हा चित्रपट होणार असून याच दिवशी जॉन अब्राहम याचा 'बाटला हाऊस', प्रभासचा 'साहो' आणि अक्षय कुमार याचा 'मिशन मंगल' बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी एकत्र भिडणार आहेत. मात्र यात कोणता सिनेमा बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.