बॉलिवूड कपल्समध्ये नात्यातील चढ-उतार हे अगदी सामान्य आहेत. यापूर्वी आपण अनेक बॉलिवूड कपल्स विभक्त झाल्याचे पाहिले आहे. तर या बॉलिवूड स्टार्सचा ब्रेकअप-पॅचअप सिलसिला प्रेक्षकांसाठी काही नवा नाही. आता अजून एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे. अभिनेत्री दिया मिर्जा (Dia Mirza) हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे तब्बल 11 वर्षांचे पतीसोबतचे नाते संपुष्टात आणल्याचे जाहीर केले. तसंच हा निर्णय दोघांनीही सहमताने घेतला असल्याचेही तिने सांगितले.
2014 मध्ये दिया, साहिल संघासोबत (Sahil Sangha) विवाहबद्ध झाली. लग्नापूर्वी अनेक वर्ष ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. ही बातमी जाहीर करताना दियाने एक खास नोट लिहिली आहे. या नोटमध्ये दियाने आपल्या कुटुंबियांचे आणि मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत. तसंच प्रसारमाध्यमांनी या निर्णयाचा आदर करावा, अशी विनंती देखील केली आहे. तसंच साहिल आणि माझा संसार जरी मोडला असला तरी आम्ही एकमेकांचे कायम मित्र राहू. आमच्या 11 वर्षांच्या नात्याबद्दल आम्हाला आनंद आहे, असेही तिने लिहिले आहे. साहिल आणि दिया बिजनेस पार्टनर्स होते. दियाची ही पोस्ट चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे. (अर्जुन रामपाल बाबा बनणार या खुशखबरीवर पहिली पत्नी मेहर जेसियाने 'ही' दिली प्रतिक्रिया)
दिया मिर्जा पोस्ट:
View this post on Instagram
रहेना है तेरे दिल में', 'तो तुमको ना भूल पायेंगे,' 'दम,' 'दस,' 'लगे रहो मुन्नाभाई' यांसारख्या अनेक सिनेमात दिया झळकली. तसंच अलिकडे आलेल्या 'संजू' सिनेमात तिने संजय दत्त याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मात्र अभिनेत्री म्हणून दियाला फारसे यश लाभले नाही. दियाने बॉबी जासूस या सिनेमाची निर्मितीही केली आहे. (मलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर)
दिया आणि साहिल यांचे काही खास फोटोज:
2000 मध्ये दिया फेमिना 'मिस इंडिया' ठरली. त्यानंतर तिने 'मिस एशिया पॅसिफिक' हा किताब देखील पटकावला.