मलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर

बॉलिवूड कलाकार अरबाज खान (Arbaaz Khan) आणि मलाइका अरोरा (Malaika Arora) यांनी घटस्फोट घेत एकमेकांपासून विभक्त झाले. तर मलाइका हिच्यापासून विभक्त झाल्यानंतर अरबाज याने त्याच्या आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. दोघांनी 19 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका मीडियाला असे म्हटले आहे की, त्यांच्या 16 वर्षाचा मुलगा अरहान यांच्यामुळे मलाइका आणि अरबाज एकमेकांसोबत बांधले गेले आहेत.

दोघेही एकमेकांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. तर मलाइका अर्जून कपूर याला डेट करत असून अरबाज सुद्धा इटली मधील मॉडेल जॉर्जिया ऐंड्रियानी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज आणि मलाइका यांना मुलगा असल्यामुळे ते दोघांचा सन्मान करतात. या दोघांमध्ये काही गोष्टी सुरळीत सुरु नसल्याने त्यांनी विभक्त होणे हा योग्य पर्याय निवडला.(बिकिनी घालायला नकार दिल्याने या बड्या अभिनेत्रीने गमावली कोट्यावधी रुपयांची ऑफर)

त्याचसोबत अरबाज याने असे ही म्हटले आहे की, अजूनही मलाइका हिच्या घरातील मंडळींसोबत त्याचे चांगले संबंध आहेत. परंतु मुलामुळे आम्ही दोघे एकमेकांसोबत उत्तम वागण्याचा प्रयत्न करत आहोत असे सुद्धा त्याने सांगितले आहे.