वाणी कपूर.. (Vani Kapoor) बॉलिवूड आणि साऊथ चित्रपट सृष्टीमधील एक महत्वाचे नाव. वाणी कपूर आपल्या बोल्ड अंदाजासाठी अतिशय लोकप्रिय आहे. याआधी वॉर सिनेमासाठी वाणीने बिकिनी घातली होती. तसेच बेफिक्रे या सिनेमातही तिला बिकिनीमध्ये पाहण्यात आले होते. नुकतेच या बिकिनीमुळे वाणीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वाणीला एका जाहिरातीची ऑफर मिळाली होती. यासाठी तगडे मानधन मिळणार होते. मात्र अट एकच होती की वाणी यामध्ये बिकिनीमध्ये दिसली पाहिजे. मात्र आता वाणी आपली इमेज बदलू इच्छिते त्यासाठी तिने या जाहिरातीला नकार दिला.
अशाप्रकारे या बिकिनी घालण्यास नकार दिल्याने वाणीच्या हातून ही कोट्यावधी रुपयांची जाहिरात गेली आहे. मुंबई मिरर च्या एक वृत्तानुसार वाणी कपूर हिला मिळालेली ही ऑफरची एका मोठ्या स्किनकेअर प्रॉडक्ट कंपनीची होती. पण जाहिरातीचे निर्माटा दिग्दर्शक यांची इच्छा होती की, जाहिरातीमधील मॉडेल ही बिकिनीमध्ये दिसणे गरजेचे आहे.
याबाबत वाणीचे म्हणणे आहे की, चित्रपटापेक्षा जाहिरातीची पोहोच अधिक असते. तसेच जाहिराती खूप जास्त कालावधीसाठी प्रसारित केल्या जातात, लोकांच्या डोळ्यासमोर त्या सतत राहतात. अशा जर का ती सतत बिकिनीमध्ये दिसत राहिली तर एक अभिनेत्रीची तिची इमेज पुसली जाण्याची शक्यता आहे. नुकतेच वाणी कपूरने ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आता कुठे तिचे करियर सुरु झाले आहे त्यामुळे सुरुवातीला तिला इतका मोठा धोका पत्करायचा नाही.