
Dev Kohli Passed Away: बॉलीवूडमधील दिग्गज गीतकार देव कोहली यांचे शनिवारी,26 ऑगस्ट 2023 रोजी निधन झाले. वयाच्या 80 वर्षी त्यांनी शेवटचा श्वास सोडला. 1971 पासून बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. शब्दांच्या जादूगाराने त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगीरीने प्रेक्षकांवर मोठा प्रभाव टाकला आहे. राहत्या घरी त्यांच निधन झाले आहे. त्याच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूड क्षेत्रांत मोठा शोक परसरला आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते वर्ग त्यांना श्रध्दांजली वाहत आहे.
देव कोहली जी यांनी लाल पत्थर (1971) मधील आयकॉनिक "गीत गाता हूं मैं" द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु सुरुवातीच्या काळात ते त्यांच्या करिअरचा मार्ग फार खडतर होता. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये मैने प्यार किया, बाजीगर, हम आपके है कौन, मुसाफिर, शूट आउट अॅट लोखंडवाला, टॅक्सी नंबर 9211 आणि बऱ्यांच नामाकिंत चित्रपटाच्या गाणाच्या समावेश होतो.
View this post on Instagram
देव कोहली यांनी अनु मलिक, राम लक्ष्मण, आनंद राज आनंद, आनंद मिलिंद आणि इतरांसारख्या संगीत दिग्दर्शकांसोबत अनेक हिट गाण्यांवर काम केले आहे.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जोगेश्वरी येथील ओशिवरा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील. अनेक दिग्गज कलाकार मंडळी त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहे.