रणवीर सिंग ह्याच्या ड्रेसची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली, पण दीपीका म्हणाली असे काही...
अभिनेता रणवीर सिंग (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) ह्याची ही प्रथमच वेळ नाहीये की त्याने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीचा ड्रेस घातला आहे. मात्र रणवीरने सध्या एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे त्यावरुन त्याची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे. तसेच लग्नापूर्वीसुद्धा रणवीरला त्याच्या कपड्यांवरु ट्रोल करण्यात आले होते.

रणवीर सिंगने नुकताच एक फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये रणवीरने फर करलचा जॅकेट घातला असून त्यावर विविध प्रकारचे स्टिकर्स दिसून येत आहेत. सफेद पँन्ट,सफेद रंगाचे स्वेटर आणि कलरफुल सनग्लासेस घातला आहे.मात्र या लूकमध्ये रणवीर एकदम आकर्षित दिसून येत आहे. परंतु सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून त्याच्या या कपड्यांची जोरदार खिल्ली उडविली जात आहे.

मात्र बायको दीपिका (Deepika Padukone) हिने रणवीरच्या या ड्रेसचे कौतुक करत हा ड्रेस मला खुप आवडला असे म्हणाली. तसेच माझ्या आवडनिवडीमधील हा एक सर्वात उत्तम ड्रेस असल्याची कमेंट दीपिकाने या पोस्टखाली केली आहे. तर रणवीरचा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी 'गली बॉय' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.