E-taxi start up Blu Smart And Deepika Padukone (PC- File Photo)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) 'ई-टॅक्सी स्टार्टअप ब्लू स्मार्ट'मध्ये (E-taxi Start up Blu Smart) 3 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 21 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दीपिकाने या कंपनीत काही महिला ड्रायव्हर्सला काम मिळवून दिले आहे, अशी माहिती स्टार्टअपचे सहसंस्थापक पुनीत गोयल यांनी दिली आहे. यात केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश असणार आहे. दीपिका ई-टॅक्सीमधील गुंतवणूक सुमारे 5 मिलियन डॉलर्स पर्यंत वाढू शकते, असंही गोयल यांनी सांगितलं आहे.

बॉलिवूड हंगामाशी बोलताना गोयल यांनी सांगितले की, 'दीपिकाला 'ई-टॅक्सी स्टार्टअप ब्लू स्मार्ट' कंपनीचे व्हिजन आवडले आहे. प्रवासाच्या दृष्टिकोनातून आमच्या गाड्या खूप सुरक्षित आहेत. त्यामुळे दीपिकाने यामध्ये गुंतवणूक केली. या कंपनीतील सर्व वाहने इलेक्ट्रिक आहेत. आम्ही गाड्यांचे मालक आहोत. त्यामुळे चालकांना स्वत: चे वाहन खरेदी करण्याची गरज नाही. या कंपनीत अनेक वाहन चालकांना नोकरी मिळणार आहे. या गाड्यांच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसून पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. या गाड्या शुन्य कार्बन उत्सर्जीत करतात. विशेष म्हणजे तुम्ही या गाडीची राइड रद्द केली तरी तुमच्याकडून पैसे आकारले जाणार नाहीत. तुम्ही बुक केलेली कार कॅन्सल करू शकता. परंतु, या गाडीचा चालक तुमची राइड रद्द करू शकणार नाही. या सर्व कारणांमुळे दीपिकाने या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला,' असंही गोयल यांनी सांगितलं.

हेही वाचा - लव रंजनच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर एकत्र झळकणार

दीपिकाने या कंपनीत गुंतवणूक करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन दिले आहे. महिलांना नोकरी मिळावी यासाठी दीपिकाने काही महिला ड्रायव्हर्सला बोर्डवर घेतले आहे. महिलांना बोर्डवर घेण्याची संपूर्ण कल्पना दीपिकाची होती, असंही गोयल यांनी सांगितलं. पुनीत गोयल, पुनीतसिंग जग्गी आणि अनमोल सिंग हे ब्लू स्मार्टचे संस्थापक आहेत. विशेष म्हणजे ही टॅक्सी सुविधा दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्ये सुरू झाली आहे.