Deepika Padukone Birthday (Photo Credits: Instagram)

सौंदर्याची खाण अशी मस्तानी (Mastani) ते ऍसिड अटॅक (Acid Attack) ची शिकार ठरलेली लक्ष्मी (Lakshmi)  इतक्या भन्नाट स्तरावरील भूमिका लीलया साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) उद्या म्हणजेच 5 जानेवारीला आपला 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे, हे सेलिब्रेशन धुमधडाक्यात पार पडणाऱ्या कोण्या बॉलिवूड पार्टीच्या रूपात नव्हे तर लखनऊ (Lucknow) मध्ये अगदी सध्या पद्धतीने होणार आहे, माध्यमांना याविषयी माहिती देताना दीपिकाने सांगितले की, आपला यंदाचा वाढदिवस काही खास व्यक्तींसोबत वेळ घालवून साजरा करण्याचे तिने ठरवले आहे, पण आता हे खास व्यक्ती कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हो ना? तुम्हाला ठाऊकच असेल की सध्या दीपिका तिचा आगामी चित्रपट छपाक (Chhapaak) च्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे, याच प्रमोशनचा आणि आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचा भाग म्ह्णून ती यंदा लखनऊ मधील शीरोज कॅफे मध्ये ऍसिड अटॅक पीडित महिलांसोबत सेलिब्रेशन करणार आहेमात्र या पार्टीत दीपिकाचा ऑल टाइम फॅन आणि पती रणवीर सिंह (Ranveer Singh) मात्र सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे.

दीपिका पादुकोण उद्या या कॅफे मध्ये पोहचण्याचा आधीच आज, म्हणजेच 4 जानेवारी रोजी या सेलिब्रेशनची तयारी सुरु झाली आहे, कॅफेमध्ये केक, डेक्जोरेशन इत्यादी अरेंजमेंट्स केल्या जात आहेत सोबतच या कार्यक्रमासाठी आमंत्रित ऍसिड अटॅक पीडित महिलांसाठी देखील खास तयारी केली जात आहे. Chhapaak Official Trailer: दीपिका पादुकोण च्या दमदार अभिनयाचा 'छपाक' चा ट्रेलर आऊट; अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जिद्दीची उलगडणार प्रेरणादायी कहाणी

दरम्यान, दीपिका सोबत तिचे चित्रपटातील सहकलाकार आणि स्वतः ऍसिड अटॅक सर्व्हायव्हर्स जीतू, कुंती बाला आणि ऋतु या सेलिब्रेशनसाठी उपस्थित असणार आहेत.दुसरीकडे, जरी रणवीर या सेलिब्रेशनचा भाग नसला तरी त्यानेही दीपिकासाठी काहीतरी खास केले असणार हे निश्चित आहे, आता ते खास म्हणजे नक्की काय हे अजून कळलेले नाही.