बॉलिवूडची शांतिप्रिया, मस्तानी, पद्मावती यांसारख्या अनेक भूमिकांमधून स्वत:च्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिचा आज जन्मदिवस. जगभरातल्या असंख्य चाहत्यांकडून आज तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दीपिकाचे निखळ हास्य, गालावर पडणारी सुंदर खळी आणि कमनीय बांधा असे तिच्या सौंदर्याचे वर्णन करावे तेवढं कमीच आहे. बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याच्याशी लग्न केल्यानंतर या दोघांची गोड जोडी नेहमीच चाहत्यांचा आणि समस्त बॉलिवूड इंडस्ट्रीचा चर्चेचा विषय ठरली. दीपिका ने 2007 मध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान सह 'ओम शांति ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले हे आपल्या सर्वांना माहितच आहे. पहिल्या चित्रपटाच्या यशस्वी घोडदौडीनंतर तिनेही तिचे बॉलिवूडमध्ये पाय घट्ट रोवले आणि एकाहून एक सरस चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत गेली. आज ती बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी आघाडीची नायिका आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की ओम शांति ओम या चित्रपटाच्या आधीही तिने एका म्यूझिक अल्बममधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते आणि हा म्युझिक अल्बम होता सुप्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया याचा. 'नाम है तेरा' असे या गाण्याचे नाव असून हे गाणे 2006 मध्ये आले होते. तेव्हा हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. तसेच हिमेश रेशमियालाही खूप प्रसिद्धी मिळाली होती. मात्र गाण्यात असलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री दीपिका पादुकोणला मात्र तेव्हा तितकी प्रसिद्धी मिळाली नव्हती.
पाहा व्हिडिओ
हेदेखील वाचा- Deepika Padukone Birthday: रणवीर सिंह सोबत नव्हे तर 'या' खास व्यक्तींसोबत लखनऊ मध्ये वाढदिवस साजरा करणार दीपिका पादुकोण
बघा कुणाचे नशीब कुठे उघडू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. तेव्हा या गाण्यामुळे तितकीशी प्रसिद्ध न झालेली अभिनेत्री आज बॉलिवूडची आघाडीची नायिका बनली आहे. या गाण्यातही दीपिका खूप सुंदर दिसत आहे.
दीपिका पादुकोण सध्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या 10 जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडची शान असलेल्या दीपिका पादुकोणला तिच्या पुढील वाटचालीसाठी लेटेस्टली मराठी कडून मनापासून शुभेच्छा!