डिसेंबर महिना असेल फुल मनोरंजनाचा, 'हे' चित्रपट आणि सीरिज होणार प्रर्दर्शित, पाहा यादी
(Photo Credit - Instagram)

हळुहळू गोष्टी रुळावर येत असल्या तरी, तरीही लोक चित्रपटगृहात किंवा बाहेर कुठेतरी जाऊन मनोरंजन करणे टाळताना दिसतात. अशा परिस्थितीत, जे घरी आहेत आणि ज्यांना कंटाळा येत  नाही त्यांच्यासाठी हा महिना म्हणजे डिसेंबर मनोरंजनाने भरपुर भरलेला असणार आहे. केवळ OTT प्रेमींसाठीच नाही, तर सिनेमाप्रेमींसाठीही चित्रपटगृहांवर भरपूर मनोरंजन होणार आहे. डिसेंबरमध्ये OTT आणि चित्रपटगृहांमध्ये कोणते चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होत आहेत याची यादी आम्ही तुमच्यासाठी घवुन आलो आहोत. तुमचे कॅलेंडर उचला आणि तारखा चिन्हांकित करा, कारण हा महिना मनोरंजनाने भरलेला असणार आहे. चला तर मग बघूया या महिन्यात चित्रपटगृह आणि OTTवर कोणते चित्रपट प्रर्दर्शित होणार आहे? (हे ही वाचा Actor Brahma Mishra Passes Away: 'Mirzapur' फेम अभिनेता ब्रह्मा मिश्रा याचे निधन; वर्सोवा येथील राहत्या घरी आढळला मृतदेह.)

डिसेंबरमध्ये प्रर्दर्शित होणाऱ्या चित्रपटाची यादी -

1. बॉब बिस्वास

दिया अन्नपूर्णा घोष दिग्दर्शित बॉब बिस्वास हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि चित्रांगदा सिंग महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ३ डिसेंबरला Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

2. कोबाल्ट ब्लू

कोबाल्ट ब्लू 3 डिसेंबर रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सचा हा मूळ चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रतीक बब्बर, नेले मेहंदळे आणि अंजली शिवराम महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही कथा एका भाऊ आणि बहिणीची आहे, जे एकाच माणसाच्या प्रेमात पडतात.

3. पुष्पा: द राइज – भाग १

अल्लू अर्जुनचा हा चित्रपट या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशातील टेकड्यांवर रेड सँडर्सच्या दरोड्याभोवती फिरते. या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुन पहिल्यांदाच रश्मिका मंदान्नासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट ७ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

4. चंदीगड करे आशिकी

आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांचा हा एक रोमँटिक चित्रपट आहे, ज्यामध्ये केवळ रोमान्सच नाही तर भरपूर ड्रामाही आहे. भूषण कुमार निर्मित आणि अभिषेक कपूर दिग्दर्शित हा चित्रपट १० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

5. स्पायडर-मॅन: नो वे होम

टॉम हॉलंड आणि जेंडाया यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. मात्र, त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १६ डिसेंबरला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे.

6. द अनफॉरगिवेबल 

यामध्ये बंदिवासात असलेली एक महिला पुन्हा समाजात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते, बुलॉक या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ती या चित्रपटाची निर्मातीही आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता 10 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

7. अरण्यक सीझन 1

रवीना टंडन नेटफ्लिक्सच्या या सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. या सीरिजमध्ये रवीना एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, जी तिच्या आयुष्यातील एका मोठ्या प्रकरणाच्या शोधात आहे. यादरम्यान, तीच्याकचे एक मोठी केस देखील येते. ही सीरिज 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

8. डीकपल्ड

हा नेटफ्लिक्स चित्रपट एका जोडप्याच्या विभक्त होण्याची कथा सांगते. आर्या आणि श्रुती हे दोन जोडपे वेगळे होऊ इच्छितात. आर्याच्या पात्रात आर. माधवन आणि श्रुतीची भूमिका सुरवीन चव्हाण यांनी केली आहे. हार्दिक मेहताचा हा चित्रपट १७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

9. 83

प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या १९८३ च्या विश्वचषकातील आठवणींना उजाळा देणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर हार्डी संधू, एमी विर्क आणि दीपिका पदुकोण असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

10. श्याम सिंह रॉय

साउथ स्टार नानी आणि साई पल्लवी स्टार हा चित्रपट कोलकात्याच्या 1970 च्या आसपास विणलेला आहे. चित्रपटात नानी एका लेखक आणि समाजसुधारकाच्या भूमिकेत दिसणार आहेत, जो अत्याचारित महिलांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी कटिबद्ध आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

11. अतरंगी रे

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा हा चित्रपट २४ डिसेंबरला डिस्ने प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका विचित्र गरीब प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटात मोहम्मद झीशान अयुबही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

12. जर्सी

हा चित्रपट नानीच्या तेळगु चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कूपर आणि मृणाल ठाकूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात पंकज कपूर यांचीही भूमिका आहे. हा चित्रपट ३१ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.