Dabangg 3 Public Reviews: आज प्रदर्शित झाला सलमान चा बहुप्रतीक्षित चित्रपट; पहा काय म्हणाले प्रेक्षक
Dabangg 3 (Photo Credits: Facebook)

Dabangg 3 Reviews: 2019 वर्षातील बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित सिनेमा दबंग 3 अखेर आज प्रदर्शित झाला आहे. सलमानने या चित्रपटाच्या रूपाने त्याच्या फॅन्सना यावर्षीची एक मोठी भेट दिली असली तरी प्रेक्षक मात्र नाराज झालेले दिसत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर अनेकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून सलमान खानचा दबंग 3 डोकेदुखी ठरणारा आहे असंच वाटतंय.

'दबंग ३' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. काही नेटिझन्सनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे तर काहींनी सलमानला 'हा चित्रपट का केला?' असा प्रश्न विचारला आहे.

एका नाटकाऱ्याने ट्विटरवर लिहिले की, 'मला फुकटात तिकिट मिळालं. पण सिनेमा पाहिल्यानंतर मी फुकटात तरी या सिनेमाचं तिकिट का घेतलं असं प्रश्न मला पडला आहे. पण मी सलमानचा फॅन असल्यामुळे उद्या तिकीट विकत घेईन आणि सिनेमा पाहीन. पण असं कधीपर्यंत चालणार? एकतर सिनेमे तरी चांगले तयार कर किंवा निवृत्ती घे.'

एका प्रेक्षकाने तर या चित्रपटावर टीका करत म्हटलं आहे, 'दबंग ३ सिनेमाचा एका ओळीत रिव्ह्यू द्यायचा झाला तर अतिशय घाणेरडा आणि फ्लॉप चित्रपट  असाच देता येईल. याला पाचपैकी एक स्टार द्यावा. हा स्टारही सिनेमातील म्युझिक आणि गाण्यांच्या लिरिक्ससाठी.'

या अशा नेगेटिव्ह प्रतिक्रिया तर पाहायला मिळतातच पण काहींना मात्र हा सिनेमा आवडला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सलमानचे कौतुक देखील केले आहे. सिनेमाच्या प्रतिक्रिया जरी संमिश्र असल्या तरी दबंग 3 बॉक्स ऑफिसवर किती कामे करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.