'दबंग 3' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिस कमावला 24 कोटींचा गल्ला
सलमान खान। File Photo

Dabangg 3 Collection Day 1: बॉलिवूडमध्ये मेगास्टार्सपैकी एक असलेल्या सलमान खानचा 'दबंग 3'(Dabangg 3 ) काल (20 डिसेंबर) प्रदर्शित झाला आहे. सलमान खान, सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा अशी स्टारकास्ट असणारा 'दबंग 3' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर 24 कोटीचा गल्ला कमवण्यात यशस्वी झाला आहे. सध्या देशभर 'नागरिकत्व कायद्या'वरून तणावाचे वातावरण आहे. अशामध्येही दबंग 3 ने 20 कोटींचा टप्पा पहिल्याच दिवशीच कमावण्यात यशस्वी ठरला आहे. Dabangg 3 HD Full Movie Leaked on TamilRockers for Free Download & Watch Online: सलमान खान चा नवा चित्रपट ठरला ऑनलाईन पायरसीचा शिकार

तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून 'दबंग 3' च्या कलेक्शनची माहिती दिली आहे. दरम्यान सध्या देशभरातील तणावग्रस्त परिस्थितीचा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. दबंग 3 सिनेमा पहिल्या दिवशी 25 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज होता मात्र सध्या अनेक ठिकाणी तणावाची स्थिती, जमावबंदी लागू असल्याने सिनेमागृहांकडे प्रेक्षक येत नाहीत. अनेक ठिकाणी सिनेमागृह लवकर बंद करावी लागत असल्याने त्याचा फटका सिनेमाला बसला आहे.

सलमान खानच्या सुपरहीट सीरीजपैकी 'दबंग'चा 'दबंग 3' हा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन्ही भागांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. आता दबंग 3 सिनेमा तामिळ, तेलगू, कन्नद भाषेतूनही प्रदर्शित झाला आहे.