Dabangg 3 (Photo Credits: Instagram)

अखेर सलमान खान व सोनाक्षी सिन्हा यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट दबंग 3 (Dabangg 3) प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या रिव्हूजनुसार हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असल्याचे दिसून येत आहे. मात्र दबंग 3 हा पूर्ण चित्रपट प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ऑनलाइन लीक झाला आहे. कुख्यात अशा तमिळरॉकर्सने (Tamilrockers) आपल्या वेबसाईटवर हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. या गोष्टीचा परिणाम दबंग 3 च्या कमाईवर होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर, अनेक वापरकर्त्यांनी या चित्रपटाच्या टॉरंट डाउनलोड लिंकचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत.

एका ट्विटर युजरने केलेल्या दाव्यानुसार चित्रपटाची अतिशय उच्च प्रतीचे प्रिंट लीक झाली आहे. ही गोष्ट समजताच अनेक सालमान आणि सुदीपच्या चाहत्यांनी चित्रपटाची पायरसी बंद करावी व लोकांनी असे लीक झालेले चित्रपट पाहू नये असे आवाहन केले आहे. तमिळरॉकर्स ही वेबसाईट चित्रपटांची पायरसी करण्यात अव्वल असून, त्यांच्या वेबसाईटवर नव्याने प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची कॉपी प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाते.

(हेही वाचा: 'दबंग 3' च्या प्रदर्शनाआधीच Dabangg 4 ची स्क्रिप्ट तयार; सलमान खानने केला मोठा खुलासा)

आतापर्यत या वेबसाइटच्या माध्यमातून बिग बजेट सिनेमे लीक केले गेले आहेत. पायरसी केलेल्या चित्रपटांचा मोठा फटका निर्माते आणि प्रोडक्शन हाऊसला बसतो. यामुळे दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court)  इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISPs) यांना तमिल रॉकर्स (Tamil Rockers), EZTV, कॅटमूव्हीज आणि लाइमटॉरेंट यांसारख्या वेबासाइटला सेवा पुरवणे बंद करण्याचे आदेश दिले होते.