'दबंग 3' च्या प्रदर्शनाआधीच Dabangg 4 ची स्क्रिप्ट तयार; सलमान खानने केला मोठा खुलासा
सलमान खान (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) चाहते त्याच्या आगामी ‘दबंग 3’ (Dabangg 3) चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर यापूर्वीच रिलीज झाले आहेत, ज्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे. सलमानने आपल्या पुढील चित्रपटाची म्हणजेच ‘राधे’चीही घोषणा केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा आहे. नुकतेच सलमानने 'मुंबई मिरर' ला दिलेल्या एका खास मुलाखतीत दबंगविषयी अनेक खुलासे केले आहेत. चुलबुल पांडे नक्की असा का झाला याचे उत्तर दबंग 3 मध्ये मिळणार आहे. यासोबतच सलमान खानने दिलेल्या माहितीनुसार दबंग 4 (Dabangg 4) चीही स्क्रिप्ट लिहून तयार आहे.

होय, दबंग 3 च्या प्रदर्शानाधी सलमानने दबंग 4 बद्दल माहिती दिली. या चित्रपटाची कथा, पटकथा लिहून तयार आहे व लवकरच या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे. आजच्या काळात, चित्रपट निर्माते जेव्हा सीक्वल बनवण्यासाठी धडपडत असतात, तेव्हा दबंग सिरीजमधील प्रीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच सिरीजमधील चौथा चित्रपटही लिहून तयार असल्याचे सलमानने सांगितले. सलमानचा बहुप्रतीक्षित 'दबंग 3' हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

(हेही वाचा: Saiee Manjrekar Glam Look: महेश मांजरेकर यांची मुलगी ‘सई’ दबंग 3 मधून बॉलीवूडमध्ये करत आहे पदार्पण; पहा तिचे ग्लॅमरस फोटो)

दबंग 3 मध्ये सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा रज्जोची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर सलमान चुलबुल पांडेच्या व्यक्तिरेखेची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरसुद्धा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 'दबंग' व्यतिरिक्त सलमान खान 'एक था टायगर' आणि 'किक' सारख्या चित्रपटाच्या फ्रेंचायझीमध्येही काम करणार आहे.