आपल्या सर्वांना माहीतच आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर घराणेशाही (Nepotism), कंपूशाही बाबत सुरु झालेल्या वादामध्ये सलमान खानचे (Salman Khan) नाव गोवले गेले आहे. सुशांतला मुद्दाम चित्रपट न दिल्याचा आरोप सलमान खानवर होत आहे. मात्र अजूनतरी पोलिसांना सुशांत व सलमान य दोघांबाबतचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याने, सलमानवरचे आरोप सिद्ध झाले नाहीत. आता काही नेटिझन्सनी करण जोहर (Karan Johar) आणि एकता कपूर (Ekta Kapoor) सोबत सलमान खानच्या चित्रपटांवरही बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर, अशा या सेलिब्रिटींना वाईट ठरवण्यासाठी त्यांच्या सिनेमांशी निगडीत काही जुन्या व्हिडिओ क्लिप्सही शेअर केल्या जात आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली जात आहे, ज्यामध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) दिसत आहेत. क्लिपमध्ये हे दोघेही त्यांच्या दबंग (Dabangg) चित्रपटामधील गेटअपमध्ये एका पायरीवर बसलेले दिसतात. त्यानंतर सोनाक्षी सलमानच्या मांडीवर आपले डोके ठेवते होते आणि पुढे सलमान तिच्या मांड्यांना हात लावतो, असे चित्र यामध्ये दिसते. एका ओव्हरहेड कोनातून मोबाईलवर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या एका अपमानास्पद कॅप्शनसह सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून सलमान वासनेचा शिकारी असल्याचे बोलले जात आहे.
Character Less Hawasi Darinda #SalmanKhan #boycottsalmankhan pic.twitter.com/thyDP5jB7m
— Atul Singh Shanu 🍾 (@KhiladisShanu) June 20, 2020
जर का तुम्ही थोडा विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल, दबंगच्या शूट दरम्यान घेण्यात आलेली ही Behind the Scenes क्लिप आहे. अगदी स्पेसिफिक बोलायचे तर, दबंग 3 चित्रपटावेळी हा व्हिडिओ शूट केला गेला आहे व यावेळी 'हबीबी के नैन' (Habibi Ke Nain) या गाण्याचे शुटींग चालू होते. या गाण्यामध्ये सलमान व सोनाक्षी यांचा रोमान्स दिसून येतो. (हेही वाचा: अखेर सोनम कपूरची कबुली- ‘माझ्या वडिलांमुळेच मी या ठिकाणी आहे’; नेटीझन्सनी पुन्हा केले ट्रोल (See Tweets))
पहा मूळ गाणे -
यावरून हे स्पष्ट होते की, मुद्दाम चुकीचा आणि द्वेषपूर्ण गोष्टीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने किंवा एकाद्या व्यक्तीला मुद्दाम बदनाम करण्याच्या उद्दशाने अशा व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. अशाप्रकारे इंटरनेट बुलिंग (Internet Bullying) इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या वाचकांना विनंती करतो की, कोणत्याही गोष्टीचा स्त्रोत माहिती असल्याशिवाय किंवा त्यामागील सत्य माहिती असल्याशिवाय गोष्टी शेअर करू नका.