Sonam Kapoor (Photo Credits-Twitter)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput), याच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीमधील घराणेशाही विषयीची सर्वात मोठी चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नेपोटिझम (Nepotism) विरुद्ध आवाज उठवला आहे. याचबाबतीत अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) हिलाही सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोनम कपूर सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली की, तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरील कमेंट सेक्शन बंद केला आहे. आता सोनम कपूरने एका ट्विटद्वारे तिच्यावर होणाऱ्या ट्रोलला प्रत्युत्तर दिले आहे. फादर्स डे निमित्त केलेल्या ट्वीटमध्ये सोनमने याची कबुली दिली आहे की ती या ठिकाणी आहे ते तिच्या वडिलांच्यामुळेच.

पहा ट्वीट-

आजच्या ‘वर्ल्ड फादर्स डे’निमित्त अनेक सेलेब्जनी आपल्या वडिलांचे फोटो शेअर केले आहेत. काहींनी आपल्या वडिलांबद्दल सुंदर शब्द आहेत. सोनम कपूरनेही या दिवसाचे औचित्य साधून एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये ती म्हणते, ‘आजच्या फादर्स डेच्या निमित्ताने एक गोष्ट मला सांगायला आवडेल, होय मी माझ्या वडिलांची मुलगी आहे आणि हो मी त्यांच्यामुळेच इथे आहे. कपूर कुटुंबात जन्म घेतल्याने मला जन्मतःच अनेक गोष्टी प्राप्त झाल्या आणि ही गोष्ट काही माझा अपमान नाही. माझ्या वडिलांनी मला सर्व काही देण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे आणि या ठिकाणी मी जन्मले हे माझे नशीब आहे. मला याचा अभिमान आहे.’ (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या रिया चक्रवर्तीवर आरोप; मुजफ्फरपूर येथे याचिका दाखल)

अशा प्रकारे सोनम कपूर झाली ट्रोल - 

तर अशाप्रकारे सोनम कपूरने हे मान्य केले आहे की, अनिल कपूर आणि कपूर कुटुंबामुळे तिला हे सर्व काही मिळाले आहे. दरम्यान, एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त शेअर केला जात आहे. यात सोनम कपूर करण जोहरला सांगत आहे की, तिला सुशांतसिंह राजपूत माहित नाही. हा व्हिडिओ शेअर करून सुशांतच्या चाहत्यांनी सोनमला सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल केले आहे. हीच परिस्थिती सोनाक्षी सिन्हा व आलिया भट्ट यांचीही आहे.