पंचतारांकित हॉटेलकडून ग्राहकांची लुट; संगीतकार शेखर रवजियानीला आलेल्या अनुभव वाचून बसेल धक्का
संगीतकार शेखर रवजियानी (Photo Credit : Instagram)

काही महिन्यांपूर्वी अभिनेता राहुल बोसला, चंदिगढमधील पंचतारांकित हॉटेल जे डब्ल्यू मॅरियट (J W Marriott) येथे अवघ्या 2 दोन केळांसाठी तब्बल 442 रुपये दर आकाराला होता. त्यावेळी या घटनेबाबत सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता संगीतकार आणि गायक शेखर रवजियानी (Shekhar Ravjianii) यालाही असच काहीसा अनुभव आला आहे. हयात रीजेंसी (Hyatt Regency) या पंचतारांकित हॉटेलमध्ये शेखरला अवघ्या दोन एग व्हाईटसाठी (अंड्यामधील फक्त पांढरा भाग) चक्क 1672 रुपये आकारण्यात आले आहेत. ट्वीटच्या माध्यमातून शेखरने ही बातमी शेअर केली आहे.

शेखर रवजियानी ट्वीट -

शेखरने ही गोष्ट शेअर करताना या अंड्यांचे बिलही सोबत जोडले आहे. त्यानुसार अहमदाबाद, उस्मानपुरा येथील हयात रीजेंसीमधील आज संध्याकाळचे हे बिल असल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये तीन उकडलेल्या अंड्यांसाठी 1350 रुपये आकारले आहेत. त्यावर कर आकारून हे बिल 1672 रुपयांपर्यंत गेले आहे. ट्वीट करताना शेखर म्हणतो, ‘तीन अंड्यांसाठी चक्क 1672 ?? हे जरा महागडेच जेवण होते’ (हेही वाचा: हॉटेलने दोन केळांसाठी आकारले 442 रुपये; राहुल बोसच्या 'त्या' व्हिडीओ नंतर कर विभागाकडून 25 हजारांचा दंड)

या घटनेबाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत -

दरम्यान राहुल बोसने त्याच्यासोबत घडलेली गोष्ट शेअर केल्यावर, चंडीगढ़च्या डेप्युटी कमिशनरनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार एक्साइज व टॅक्सेशन डिपार्टमेंटने (Excise and Taxation Department) जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलला 25 हज़ार रुपयांचा दंड ठोठावला होता. आता शेखरच्या बाबतील हा विभाग काही कारवाई करतो का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.