Coronavirus: गायिका कनिका कपूर हिला डिस्चार्ज, अखेर सहावी कोरोना व्हायरस चाचणी आली निगेटीव्ह
Playback Singer Kanika Kapoor (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हारस बाधित गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) हिला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कनिका कपूर हिला कोविड 19 (COVID-19) बाधा झाली होती. तिच्यावर संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) येथे उपचार सुरु होते. कनिका कपूर हिच्यावर उपचारादरम्यान कोरोनाच्या एकूण सहा चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील पहिल्या 5 चाचण्या या पॉझिटीव्ह आढळल्या होत्या. अखेर पाचवी आणि सहावी चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तिला डिस्चार्ज मिळाला आहे.

कनिका कपूर हिला कोरोना व्हायरस संक्रमन झाल्याचे 20 मार्च रोजी पुढे आले. तेव्हा पासून तिच्यावर एसजीपीजीआयएमएस रुग्णालयात उपचार सुरु होते. कनिका कपूर ही 14 मार्च रोजी लंडन येथून परतून लखनऊ येथे आली होती. तिथे ती एका हॉटेलमध्ये थांबली होती. लखनऊ येथील मुक्कामादरम्यान तिने एकूण तीन पार्ट्यांमध्ये सहभागी झाली.

विशेष म्हणजे कनिका सहभागी झालेल्या तीन पार्ट्यांपैकी एका पार्टीस राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया त्यांचे पूत्र आणि विद्यमान भाजप खासदार दुष्यंत सिंह यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. इतकेच नव्हे तर या पार्टीत माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांचे कुटुंबीय हे सुद्धा उपस्थित होते. याशिवाय उत्तर प्रदेशचे माजी मंत्री रघुराज प्रताप सिंह राजा भैया, कुश भार्गव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे काय? याबाबत भीती व्यक्त केली जात होती. मात्र, या सर्वांची चाचणी निगेटीव्ह आली. (हेही वाचा, Kanika Kapoor Health Update: कनिका कपूर हिची कोरोना व्हायरसची पाचव्यांदा चाचणी; अजूनही रिपोर्ट्स पॉझिटीव्हच)

एएनआय यूपी ट्विट

लंडन येथून परतल्यावर कोणतीही माहिती न देता तसेच, कोरोना व्हायरस संकटापासून बचाव करण्यासाठी तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कनिका कपूर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर कनिकाने आपल्या वकीलांशी चर्चा केली. कनिका हिने विमानतळावरही कोरोना व्हायरस चांचणी केली नव्हती. कोरोना संक्रमन लपविल्या प्रकरणी सरोजनीनगर पोलीस ठाण्यात कनिका हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे.