बॉलिवूड गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) ही सातत्याने पाचव्यांदा कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. कनिका कपूर हिला कोरोना व्हायसरची (Coronavirus) लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघडे झाले. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु असून अजूनही तिचे रिपोर्ट्स कोरोना पॉझिव्हटच आहेत. तिच्यावर सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचार सुरु आहेत. दर 48 तासांनंतर कोरोना व्हायरस बाधितांची Sample Test करण्यात येते. मात्र कनिकाची पाचव्यांदा केलेली टेस्टही पॉझिटीव्ह आली आहे. यासंदर्भात संजय गांधी संस्थेचे संचालक आर. के. धीमान यांनी सांगितले की, "कोरोना व्हायरसचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले असले तरी कनिकाची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळ काळजीचे काही कारण नाही."
अलिकडेच कनिकाने ती आयसीयू मध्ये नसून कुटुंबाला भेटण्यासाठी आतुर असल्याचे मीडियाला सांगितले होते. लखनऊ मधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये वैद्यकीय निगरागीखाली तिला ठेवण्यात आले आहे. (कोरोनाग्रस्त कनिका कपूरच्या नखऱ्यांनी रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ वैतागला)
लंडनहून परतल्यानंतर कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 9 मार्चला भारतात परतल्यानंतर तिने एका पार्टीला हजेरी लावली होती. त्या पार्टीत तब्बल 100 लोक उपस्थित होते. या पार्टीला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंह आणि उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह हे ही उपस्थित होते. कनिकाचे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर त्यांचीही चाचणी करण्यात आली. मात्र त्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले. तरी देखील त्यांना काही दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.