गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) हिची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी चौथ्यांदाही पॉझिटीव्ह आली आहे. रुग्णालयात असलेल्या कनिका हिच्या वर्तनामुळे आगोदरच हैराण झालेले रुग्णालय प्रशासन या चाचणीमुळे पुन्हा एकदा चिंताक्रांत झाले आहे. गेल्या शुक्रवारी कनिकाचा नमुना चाचणीसाठी घेतला होता. या चाचणीचा अहवाल ना निगेटीव्ह आला ना पॉझिटीव्ह. त्यामुळे पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. आता नव्याने घेतलेल्या कोविड-19 चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कनिकाचे कुटुंबीय या अहवालामुळे चिंतेत आहे.
कनिका कपूर गेल्या 20 मार्च रोजी पीजीआय रुग्णालयात दाखल झाली होती. कनिका 9 मार्च रोजी लंडन येथून परतली. तिने विमानतळ ते लखनऊ असा प्रवास केला. या काळात तिला खोकला, ताप असा त्रास होऊ लागला. त्यामुळे ती रुग्णालयात दाखल झाली. तिची कोरोना व्हायरस चाचणी केली असता ती पॉझिटव्ह आली. त्यामुळे कनिकाला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे निदान झाले.
कनिकाची पहिली चाचणी पॉझिटव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेले आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांच्यासह 35 पेक्षाही अधिक लोकांची चाचणी करण्यात आली. या सर्वांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. असे असले तरी ते सर्वजण अद्यापही क्वारंटाईन आहेत. (हेही वाचा, कोरोनाग्रस्त कनिका कपूरच्या नखऱ्यांनी रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ वैतागला)
ट्विट
#Bollywood singer #KanikaKapoor has tested positive for #Coronavirus for the fourth consecutive time, causing considerable concern to her family.#CoronaUpdate #CoronavirusOutbreak pic.twitter.com/dEfJ9I4skF
— IANS Tweets (@ians_india) March 29, 2020
कनिका कपूर हिला संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआईएमएस) रुग्णालयात दाखल आहे. इथल्या रुग्णायलय प्रशासनाने आरोप केला होता की, कनिका कपूर उपचारांसाठी आवश्यक ते सहकार्य करत नाही. रुग्णालयात ती एका रुग्णाप्रमाणए नव्हे तर, सेलिब्रेटी व्यक्तीसारखे वर्तन करत आहे.
कनिकाचा चौथ्यांदा आलेला अहवाल पॉझिटव्ह असल्याचे पाहून तिच्या परिवार चिंतेत आहे. तिच्या कुटुंबातील एका सदस्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की की, आम्हाला चिंता जरुर आहे. पण, आम्ही काही करु शकत नाही. आम्ही तिच्यासाठी प्रार्थना करत आहोत.