पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईसाठी आज दिवे पेटवण्याचे आवाहन जनतेला केले होते. देशातील कोरोनाचा अंधःकार दूर करण्यासाठी आज, 5 एप्रिल रोजी सर्वांनी आपल्या घरातील लाईट्स बंद करून, रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे पेटवण्यास पीएम मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार आज देशभरात विविध ठिकाणी जनतेने, नेत्यांनी अगदी सेलेब्जनेही या आवाहानाचे स्वागत केले. अक्षय कुमार (Akshay Kumar), तापसी पन्नू, विक्की कौशल यांच्यासह अनेक सेलेब्जनी आपल्या घरात दिवे लावले होते.
🪔 #9pm9minutes pic.twitter.com/upxPhbVMvN
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 5, 2020
India 🇮🇳 comes together in solidarity #9minutes9pm #coronavirus #IndiaFightsCornona #Covid19Out #PMModiOnCorona #IndiaBattlesCoronavirus pic.twitter.com/McZiAvS8ME
— Pushkar Jog (@jogpushkar) April 5, 2020
Let us pray to lord Krishna, the son of Vasudeva, to give us strength to destroy the enemy of humanity. Stay strong, stay postive. We will overcome this together! #9baje9minute #9बजे9मिनट pic.twitter.com/w4bqMOobEq
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) April 5, 2020
सध्या देशावर कोरोना विषाणूचे मोठे संकट आले आहे. या विषाणूमुळे जवळजवळ साडेतीन हजार लोक संक्रमित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर याआधी पीएम नरेंद्र मोदी यांनी महत्वाच्या सेवांमध्ये असलेल्या लोकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळी-थाळी वाजवा हा उपक्रम राबवला होता. आता त्यांनी या लढाईमध्ये लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी, तसेच एकतेचा संदेश देण्यासाठी रात्री दिवे पेटवण्याचे आवाहन केले होते. यामध्ये चित्रपट सृष्टीमधील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला.
Together we stand and together we will come out of this dark phase. Till then stay strong, stay safe ✨ #9Baje9Minute pic.twitter.com/9b7AlWCjw7
— Akshay Kumar (@akshaykumar) April 5, 2020
अक्षय कुमार, तापसी पन्नू, विक्की कौशल, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, कारण जोहर, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित अशा अनेक कलाकारांनी आपल्या घरात दिवे पेटवले होते. दरम्यान, रविवारी देशात कोरोना व्हायरस संसर्गाची संख्या वाढून 3,374 झाली आणि मृतांचा आकडा 77 वर पोहोचला आहे. कोरोन व्हायरसमुळे आतापर्यंत देशभरातील 274 जिल्हे बाधित झाले आहेत.