Coolie No.1 Poster: वरुण धवन-सारा अली खान च्या हटके लूकसह 'कूली नंबर 1' चा फर्स्ट लूक प्रदर्शित
Coolie No. 1 First Look (Photo credits: Twitter)

गेल्या कित्येक दिवसापासून चर्चेत असलेला देविड धवन चा कूली नंबर 1 (Coolie No.1) या चित्रपटाच्या रिमेकचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे मोशन पोस्टर चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्विटर अकाउंटद्वारे शेअर केले होते. त्यानंतर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यात सारा अली खान (Sara Ali Khan) आणि वरुण धवन (Varun Dhawan) चा अंतरंगी लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. 1 मे 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या मोशन पोस्टरमध्ये सुरुवातीला एक प्रश्न विचारण्यात आला आहे. ओळखा पाहू कोण येत आहे? असे म्हणत एक कूलीच्या पोशाखात आपल्या तोंडासमोर 3-4 बॅगा घेऊन एक माणूस येत असल्याचे दिसत आहे.

तरण आदर्शचे ट्विट:

त्यानंतर तरणने या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले. या पोस्टरमध्ये बॅगा पकडलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून वरुण धवन असल्याचे स्पष्ट झाले. या चित्रपटातील एका पोस्टरमध्ये वरुण आणि दुस-या पोस्टरमध्ये वरुण आणि सारा अली खान दिसत आहे. याचाच अर्थ या नवीन जोडीसह आपल्या रुपेरी पडद्यावर या दोघांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळणार हे वेगळं सांगायची गरज नाही. हेही वाचा- 'कुली नंबर 1' च्या रिमेकमध्ये दिसणार सारा अली खान आणि वरूण धवन, ऑगस्ट 2019 पासून शुटिंग होणार सुरू

कूली नंबर 1 चे पोस्टर:

या चित्रपटाचे दिग्दर्शन देविड धवन (David Dhawan) यांनी केले असून वासु भगनानी (Vashu Bhagnani) हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. नव्वदीच्या दशकात ज्या चित्रपटामुळे गोविंदा रातोरात स्टार झाला आणि त्याने विनोदाचा दर्जा इतका उंचावर नेला की, तिथपर्यंत पोहोचणेही इतर कलाकारांना थोडं अशक्य झाले, त्या चित्रपटाचा रिमेक देखील तितकेच जादू करणार का आणि गोविंदा-करिश्मा कपूरची गाजलेली जोडीसारखा वरुण -साराची जोडी करिष्मा दाखवणार का हे लवकरच कळेल.