व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रणबीर कपुर आपल्या कुटुंबियासोबत ख्रिसमस पार्टीचे सेलिब्रिशन करत होता, दरम्यान त्याने केकवर दारू ओतली आणि 'जय माता दी' असा नारा लावला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला बरीच टीका केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका वकिलाने घाटकोपर पोलिस ठाण्यात या घटनेनंतर तक्रार केली.
View this post on Instagram
कलम २९५ ( कोणत्याही वर्गाचा धार्मिक भावनाचा हेतुपुस्पपर अपमान करणे, 298 धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर कोणताही शब्द वापरणे, 500 (अपमानित करणे) आणि 34 (सामान्य हेतूने पुढे करणे) आहेत. 'प्रतिबद्ध कायद्यानुसार एफआयआर नोंदवावा. अश्या कलमांद्वारा तक्रार नोंदवला गेला आहे. या घटनेनंतर रणबीरच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.