Climate Change: पृथ्वी वाचविण्याची आपली सर्वाची जबाबदारी, पर्यावरण बदलाचा मुद्दा अद्यापही गांभीर्याने घेतला जात नाही: भूमि पेडनेकर
Bhumi Pednekar | (Photo Credits-Facebook)

अभिनेत्री भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने पर्यावरण संवर्धन याविषयी आपली भूमिका मांडली आहे. पृथ्वी वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण बदल (Climate Change) हा विषय अद्यापही आपल्याकडे गांभीर्याने घेतला जात नाही. पाच जून रोजी पर्यावरण दिवस आहे. या दिवसाबाबत आणि एकूणच पर्यावरण बदलाविषयी नागरिकांच्या मनात जनजागृती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे भूमि पेडणेकर हिने म्हटले आहे.

भूमि पेडणेकर हिने म्हटले आहे की, पर्यावरण बदल हा मुद्दा आपल्याकडे अद्यापही गांभीर्याने घेतला जात नाही. अनेक लोकांना तर या विषयी माहितीच नाही. जगभरात पर्यावरण बदलाशी निगडीत अनेक गंभीर मुद्दे आहेत. ज्याबद्दल अनेकांना किंचीतही माहिती नाही परंतू लोक त्याचा अनुभव घेत आहेत. जसे की, दुष्काळ, जंगलांना लागणारे वनवे, महापूर, समुद्रातील पाण्याची पातळी वाढणे, गारपीठ, पीकं नष्ट होण किंवा समुद्रावरुन येणारे हवेचे गरम झोत वैगेरे. (हेही वाचा, Shubh Mangal Zyada Saavdhan: समलैंगिक अधिकारांवर व्यावसायिक चित्रपटांची आवश्यकता: आयुष्मान खुराना)

भूमि पेडणेकर हिला वाटते की, देशातील प्रत्येक नागरिकाने क्लायमेट वॉरिअर होऊन निसर्ग आणि पर्यायाने देश वाचवावा. भूमि सांगते की, क्लायमेट वॉरिअर हे पाऊल तिला सर्वात जवळचे वाटते. ज्याचा उद्देश नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि युवकांना या मोहिमेशी जोडून घेणे.