Shubh Mangal Zyada Saavdhan: समलैंगिक अधिकारांवर व्यावसायिक चित्रपटांची आवश्यकता: आयुष्मान खुराना
Ayushmann Khurrana (Photo Credits: Instagram)

Ayushmann Khurrana Talk on Gay Right: समलैंगिक अधिकारांवर व्यावसायिक चित्रपटांची आवश्यकता असल्याचे मत आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने व्यक्त केले आहे. आपला आगामी चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान' (Shubh Mangal Zyada Saavdhan या चित्रपटाबाबत बोलताना त्याने हे मत व्यक्त केले. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता आयुष्मान खुराना स्वत:ला आणखी नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा विचार करतो आहे. व्यावसायिक क्षेत्रांध्ये समलैंगिक (Gay)अधिकारांवर चित्रपट बनने महत्त्वाचे आहे. कारण अशा विषयावर आपण आपली मत सहाजासहजी बदलत नाही. त्यामुळेच अशा चित्रपटांची आवश्यकता भासते, असेही खुराना याने म्हटले आहे.

माझ्या प्रमुख व्यावसायिक चित्रपटांमध्ये 'शुभमंगल ज्यादा सावधान' ही अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण, समाजात असलेल्या पण फारशी चर्चा होत असलेल्या एका वेगळ्या विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आल्याचेही आयुष्मान खुराना याने म्हटले आहे. 'विक्की डोनर' चित्रपटातील एका धाडशी शउक्राणू दाता, 'शुभ मंगल सावधान' चित्रपटातील गुप्तरोग पीडित व्यक्ती, 'अंधाधुन' चित्रपटातील एका अंध संगितकार नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आर्टिकल 15' मधील एक आदर्श पोलीस अधिकारी अशा अनेक भूमिकांतून आयुष्मान खुराना प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला.

एकाच वेळी प्रदर्शित करणार चार चित्रपट

दरम्यान, आयुष्मान खुराना आपले चार चित्रपट पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहे. यात 'ड्रीम गर्ल', 'बाला', 'गुलाबो सिताबो' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटांचा समावेश आहे. (हेही वाचा, महिला, गे लोकांच्या अधिकारासाठी Nicki Minaj हिने रद्द केला सौदी अरब येथील आयोजित कार्यक्रम, चाहत्यांकडून टीका)

दरम्यान, आयुष्मान खुराना याने म्हटले आहे की, या चित्रपटातून (शुभ मंगल ज्यादा सावधान) त्या लोकांवर भाष्य केले आहे जे समलैंगिक लोकांबद्दल पक्षपाती विचार करतात. आम्हाला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवे. समलैंगिक लोकांबद्दल पक्षपातीपणा करणाऱ्या लोकांन हा चित्रपट आवर्जून पाहायला पाहिजे. तसेच, समलैंगिक लोकांना त्यांचा अधिकार द्यायला हवा, असेही आयुष्मान खुराना म्हणाला.