Chiranjeevi New Bald Look: दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवीने नव्या लूकमधील फोटो केला शेअर; मुलगा राम चरण ने दिली 'अशी' प्रतिक्रिया
Chiranjeevi (Photo credit- Twitter)

Chiranjeevi New Bald Look: दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवीने (Chiranjeevi) आपला नव्या चित्रपटातील लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये चिरंजीवीला ओळख कठीण झालं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर चिरंजीवीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमवलं आहे. आतापर्यंत चिरंजीवीने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, चिरंजीवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नवा लूक शेअर करताना ‘#UrbanMonk, मी खरंच सन्यासी असल्यासारखा विचार करु शकेन का?' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये चिरंजीवीने टक्कल केल्याचं दिसून येत आहे. त्याचा हा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. यातील अनेकांनी चिरंजीवीच्या फोटोला लाईक्स तसेच कमेन्ट केल्या आहेत. (हेही वाचा -Priyadarshan New Movie: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि प्रियदर्शन पुन्हा एकदा एकत्र काम करणार; पुढच्या वर्षी सुरू होणार चित्रपटाचं शुटिंग)

 

View this post on Instagram

 

#UrbanMonk Can I think like a monk?

A post shared by Chiranjeevi Konidela (@chiranjeevikonidela) on

प्राप्त माहितीनुसार, चिरंजीवीने आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी हा लूक केला आहे. चिरंजीवीच्या फोटोवर त्यांचा मुलगा राम चरण यांनी कमेन्ट दिली आहे. यात राम चरणने म्हटलं आहे, अप्पा...हे मी काय पाहिलं? तसेच चिरंजीवी यांचे पुतण्या वरुण तेज ने म्हटलं आहे की, व्वा! छान वडील दिसत आहेत. वडिलांप्रमाणेचं राम चरणने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान पक्क केलं आहे.