Priyadarshan New Movie: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि प्रियदर्शन पुन्हा एकदा एकत्र काम करणार; पुढच्या वर्षी सुरू होणार चित्रपटाचं शुटिंग
प्रियदर्शन, अक्षय कुमार (Image Credit: Instagram)

Priyadarshan New Movie: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि प्रियदर्शन (Priyadarshan) या दोघांची जोडी भारतीय चित्रपटसृष्टीला नेहमी सुपरहिट चित्रपट देत आली आहे. 'हेरा फेरी' चित्रपटापासून एकत्र आलेली ही जोडी भूलभुलैया चित्रपटापर्यंत दिसली. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून या दोघांनी एकत्र काम केलं नाही. परंतु, आता पुन्हा एकदा प्रियदर्शन आणि अक्षय कुमार एका चित्रपटात काम करणार आहेत. अक्षय कुमारने प्रियदर्शन यांच्या चित्रपटात काम करण्यास होकार दर्शवला आहे. यासंदर्भात प्रियदर्शन यांनी माहिती दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, या चित्रपटाचे शुंटिंग 2021 पर्यंत सुरू होणार आहे. मिड्डे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी सांगितले की, मी आणि अक्षय कुमार नव्या चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटाचं शुटिंग डिसेंबर महिन्यात सुरू होणार होतं. परंतु, कोरोना संकटामुळे शुटिंग होऊ शकलं नाही. आता या चित्रपटाचं शुंटिंग पुढच्या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये सुरू होईल, असंही प्रियदर्शन यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Akshay Kumar Drinks Cow Urine Every Day: अक्षय कुमार 'दररोज पितो गोमूत्र', Bear Grylls सोबतच्या Live Chat मध्ये खुलासा (Watch Video))

यासंदर्भात पुढे बोलताना प्रियदर्शन यांनी सांगितलं की, येवढ्या दिवसांपासून मला भीती वाटतं होती की, अक्षय कुमारसोबत चित्रपट करण्यासाठी माझ्याकडे चांगला विषय आहे का? अक्षय कुमार नेहमी चांगल्या कंन्टेटच्या तपासात असतो. मला कोणाकडे भीक मागायला आवडत नाही. त्यामुळे जे लोक माझ्यासोबत काम करण्यास उत्सुक असतात, त्यांच्यासोबत मला काम करण्यास आवडतं, असं स्पष्ट मतदेखील प्रियदर्शन यांनी यावेळी व्यक्त केलं.