Tamil Rockers वर अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री असलेला 'Chhichhore' चित्रपट लीक
Chhichhore (Photo Credits-Twitter)

चित्रपटांची पायरसी करणारी वेबसाइट तमिल रॉकर्सवर (Tamil Rockers ) आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांची केमिस्ट्री असलेला चित्रपट 'छिछोरे' (Chhichhore) लीक केल आहे. छिछोरे चित्रपट नुकताच गेल्या आठवड्यात शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर लगेच छिछोरे चित्रपट लीक केला आहे. परंतु या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सिनेमागृहात दिसून येत आहे. तसेच चित्रपट समीक्षकांनी सुद्धा या चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र ऑनलाईन लीक झाल्याने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाईवर परिणाम होऊ शकतो.

नितीश तिवारी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात सुशांत, श्रद्धा यांच्यासह प्रतीक बब्बर, ताहिर राज भसीन, तुषार पांडे आणि नलनीश नील यांची महत्वपूर्ण भुमिका आहे. 6 सप्टेंबरला छिछोरे प्रदर्शित करण्यात आला. तसेच छिछोरेपूर्वी प्रदर्शित झालेला प्रभासचा 'साहो' चित्रपट सुद्धा प्रदर्शित केल्यानंतर काही तासात तमिल रॉकर्सवर लीक करण्यात आला होता.(चित्रपटांची पायरसी करणाऱ्या Tamil Rockers वेबासाइटला ब्लॉक करण्याचा दिल्ली हायकोर्टाचा आदेश)

यापूर्वी 'कलंक', 'जजमेंट है क्या', 'गली बॉय' यांसारखे बिग बजेट सिनेमेसुद्धा तमिल रॉकर्सवर लीक करण्यात आले होते. मात्र 'छिछोरे' चित्रपाटाची कमाई बॉक्स ऑफिसवर सातत्याने वाढत आहे. आता पर्यंत चित्रपटाने 35 करोड रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. तर प्रेक्षकांना सुशांत आणि श्रद्धा यांची केमिस्ट्री फार आवडली आहे. एवढेच नाही चित्रपटाची कथा प्रेक्षक स्वत:च्या आयुष्यातील घटनांसोबत जोडत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक आहे.