Glacier Breaks in Uttarakhand: उत्तराखंडमधील चामोली येथे हिमकडा कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. ग्लेशियर फुटल्यानंतर 100 ते 150 लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत 9 ते 10 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. उत्तराखंड सरकारने या आपत्तीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. चामोलीत हिमकडा तुटल्यामुळे धौलीगंगा नदीला पूर आला असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानंतर ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी सांगितलं की, हिमकडा कोसळल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी प्रशासनाला योग्य मदतकार्य करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. (वाचा - Glacier Breaks in Uttarakhand: उत्तराखंड येथे ग्लेशियर फुटल्यानंतर 100 ते 150 लोक वाहून गेल्याची भीती, 9 ते 10 मृतदेह सापडले; PM Narendra Modi म्हणाले- 'संपूर्ण देशाची प्रार्थना राज्यासोबत आहे')
दरम्यान, या घटनेनंतर सर्व राज्यांच्या नेत्यांसह बॉलिवूडमधील स्टार्संनी या वृत्तावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक कलाकारांनी उत्तराखंडमधील लोकांसाठी प्रार्थना केली आहे. उत्तराखंड आपत्तीसंदर्भात सोनू सूद, दिया मिर्झा आणि श्रद्धा कपूर आदी कलाकारांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दु:ख व्यक्त केले आहे.
सोनू सूद ट्विट -
उत्तराखंड हम आपके साथ हैं।
— sonu sood (@SonuSood) February 7, 2021
अभिषेक कपूर ट्विट -
Devastating news . May god watch over those in the path of this monster..Hari om 🙏 #Uttarakhand #Chamoli
— Abhishek Kapoor (@Abhishekapoor) February 7, 2021
श्रद्धा कपूर ट्विट -
Distressing to hear about the glacier breaking off in #Uttarakhand Praying everyone’s safety there 🙏
— Shraddha (@ShraddhaKapoor) February 7, 2021
दिया मिर्झा ट्विट -
Building too many dams in the Himalayas has lead to this. Prayers for the people of Chamoli. Please contact Disaster Operations Center number 1070 or 9557444486 for help. #Uttarakhand https://t.co/x6D9X4laSj
— Dia Mirza (@deespeak) February 7, 2021
सध्या घटनास्थळी आईटीबीपीच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, चमोली दुर्घटनेत सुमारे दीडशे लोक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराच्या 600 जवानांना घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.