यंदा 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवल्समध्ये हॉलिवूड कलाकारांसोबतच बॉलिवूड अभिनेत्रींचाही जलवा पहायला मिळाला. अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut),दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra)यांनी कान्स फिल्म फेस्टिवल 2019 (Cannes Film Festival 2019) च्या रेड कार्पेटवर यंदा पाऊल ठेवलं. त्यांच्या खास डिझायनर ड्रेसची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. तिन्ही अभिनेत्रींनी वेगवेगळ्या ब्रॅन्ड्सचे ड्रेस रिप्रेझेंट केले होते.
प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्रा आता बॉलिवूड सिनेमांसोबतच हॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क करत आहे. यंदा कान्स फेस्टिवल्सच्या रेड कार्पेटवर तिने पहिल्यांदा आपली झलक दाखवली आहे.
दीपिका पादुकोण
दीपिका 2010 साली पहिल्यांदा कान्स फेस्टिवल्समध्ये रेड कार्पेटवर आली होती. यंदा गिफ्ट रॅप बो स्टाईलमध्ये दीपिकाचा ड्रेस डिझाईन करण्यात आला होता.
कंगना रनौत
कंगना यंदा कांजीवरम साडीला वेस्टर्न टचमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली. तर जमसूटचा लूक हा तिचा आफ्टर पार्टी लूक आहे.
बॉलिवूडच्या या आघाडीच्या अभिनेत्रींसोबतच यंदा हीना खानदेखील कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली. कंगना लवकरच 'मेंटल है क्या' चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे. प्रियंका 'द स्काई इज पिंक' या बॉलिवूड सिनेमात तर दीपिका 'छपाक' सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.