जगातील एक महत्वाचा चित्रपट महोत्सव म्हणून कान्स महोत्सवाकडे (Cannes Film Festival) पहिले जाते. फ्रांसच्या कान शहरात भरणाऱ्या या मोहत्सावामध्ये आपला चित्रपट दाखवणे हे अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाते. यंदा 14-25 मे दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. यावर्षी भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, या महोत्सवामध्ये भारताचा पॅव्हेलियन पाहायला मिळणार आहे. ‘द डेड डोंट डाय’ या चित्रपटापासून सुरुवात झालेल्या या महोत्सवामध्ये, प्रेमकथा आणि राजकारण संदर्भातील 111 चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. यासाठी 120 देशांमधील जवळपास 40 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भारताकडून कंगना, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण, सोनम कपूर, हीना खान, प्रियंका चोप्रा, मल्लिका शेरावत, हुमा कुरेशी अशा तारका देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
बुधवारी हीना खान कान्सच्या रेड कारपेटवर उतरली होती. हीनाची ही कान्समधील पहिलीच वेळ आहे. शायनिंग, सिल्व्हर, घोळदार गाऊनमध्ये हीनाने जवळजवळ सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले होते. कान्समध्ये हीना आपली शॉर्ट फिल्म 'लाइन्स' (Lines) चा फर्स्ट लुक प्रदर्शित करणार आहे.
दरम्यान, 2002 पासून ऐश्वर्या या महोत्सवामध्ये सहभागी होत आहे. यावर्षी 19 मे नंतर तिचे दर्शन होईल. मेट गालामध्ये आपला जलवा दाखवून दीपिका आज (16 मे) कान्समध्ये सहभागी होणार आहे. बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर 20 आणि 21 मे ला कान्समध्ये सहभागी होईल. मागच्या वर्षी कान्समध्ये डेब्यू करणारी कंगना यावर्षी 17 मेला महोत्सवात हजेरी लावणार आहे. यासर्वांमध्ये प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती प्रियंका चोप्रा आणि तिच्या पेहरावाची. यावर्षी पहिल्यांदाच प्रियंका चोप्रा कान्सच्या रेड कारपेटवर उतरणार आहे.