CAA Protests: 'हे सहन केलं जाऊ शकत नाही', पाहा असा का म्हणाला रितेश देशमुख
Riteish Deshmukh (Photo Credits: Instagram)

Riteish Deshmukh on CAA: सुधारित नागरिकत्व कायदा (Citizen Amendment Act)  लागू करण्यात आल्यापासून देशभरातून त्याला विरोध करण्यात येत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या विरुद्ध आवाज उठवत आपले मत व्यक्त केले आहे. दरम्यान, या कायद्याविरोधात काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन इतकं तापलं की गुरुवारी दिल्लीतील विद्यापीठांसह शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी देखील आंदोलनं केली तर पोलिसांच्या गोळीबारात लखनऊमध्ये एक आणि मंगळूरमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, बॉलीवूड मधील मराठी चेहरा म्हणजेच रितेश देशमुख याने देखील सोशल माडियाद्वारे आपलं मत मांडलं आहे. त्याने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये आंदोलक पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसत आहेत.

रितेशने यावर संताप व्यक्त तर केलाच पण त्याचसोबत हे सर्व कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

CAA: 'आपण भारताचे नागरिक आहोत, हे जर सिद्ध करावं लागणार असेल तर प्रॉब्लेम काय आहे?' शशांक केतकर चा नेटकऱ्यांना सवाल

रितेशने ट्विट करताना लिहिलं आहे की, “कोणत्याही परिस्थितीत हे सहन केलं जाऊ शकत नाही. शांततेत चालणाऱ्या आंदोलनामुळे मिळणाऱ्या यशात, हे आंदोलक मात्र हिंसाचार भडकवून आणि दगडफेक करून अडथळा निर्माण करत आहेत. म्हणूनच यांना अटक केले पाहिजे”. तसेच आपल्या ट्विटमधून हिंसाचार न करण्याचे आवाहन रितेशने जाणतेकडे केले आहे.