Malaika Arora Birthday: बॉलिवूडची सदाबहार ब्यूटी मलायका अरोरा (Malaika Arora) आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पहिले नाव बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आहे. अर्जुनने आपल्या प्रेयसीसोबत मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. तसेच एक गोड संदेश देखील लिहिला आहे. गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये मलायका खूपच स्टायलिश दिसत आहे. या फोटोमध्ये अर्जुन ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहत आहे, तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, 'द यिन टू माय यांग, हॅप्पी बर्थडे बेबी, फक्त तू आनंदी आणि माझी रहा.' छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई सारख्या गाण्यांवर तिच्या धमाकेदार डान्स मूव्ह्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अर्जुनची पोस्ट शेअर केली. या पोस्टला कॅप्शन देताना मलायकाने म्हटलं आहे 'केवळ तुझीचं' आणि त्यासोबत तिने रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केली आहे. (हेही वाचा - Sanak Hollywod Remake: विद्युत जामवालच्या 'सनक'चा बनत आहे हॉलीवूडमध्ये रिमेक; चित्रपटाच्या राईट्ससाठी निर्मात्यांकडे चौकशी- Report)
अर्जुनच्या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मलाइकाला शुभेच्छा दिल्या. दिग्दर्शक अभिषेक कपूरने लिहिले, 'हॅपी बर्थडे मल्ला', तर अभिनेत्री तारा सुतारियाने ब्लॅक हार्ट इमोजी पोस्ट केले. यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनी कमेन्ट केली आहे की, "हॅपी बर्थडे @malaikaaroraofficial big love" यासोबत त्यांनी लाल हार्ट इमोजी जोडली आहे. चाहतेही त्यांच्या आवडत्या स्टारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
मलायका आणि अर्जुनने 2019 मध्ये इंस्टाग्रामवर त्यांचे नाते अधिकृत केले होते. तेव्हापासून ते प्रत्येक मुलाखतीत आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलतात. तथापि, मलायका आज 49 वर्षांची झाल्यामुळे दोघांना अनेकदा त्यांच्यातील वयाच्या फरकामुळे ट्रोल केले जाते. अर्जुनने जूनमध्ये त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या लग्नाच्या बातम्या अनेकदा मीडियामध्ये येत असतात. पण, या जोडप्यांनी कधीच त्यावर शिक्कामोर्तब केले नाही.