#BoycottErosNow: स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म अश्लीलतेचे ठिकाण म्हणत कंगना रनौत हिला राग अनावर
कंगना रनौत (Photo Credits-Facebook)

#BoycottErosNow: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  हिने आता ओटीटी प्लॅटफॉर्म वर निशाणा साधला आहे. कंगना हिने असे म्हटले आङे की, ओटीटी प्लॅटफॉर्म हे अश्लीलतेचे ठिकाण आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर Eros Now यांनी एक पोस्टर शेअर केले आहे. त्यामध्ये रणवीर सिंह, सलमान खान आणि कतरीना कैफ यांच्या फोटोसह काही मिम्स आहेत. इरॉस यांना टॅग करत कंगना हिने ट्विटरवर असे लिहिले आहे की, आपल्या समुदायाला सिनेमाघरांत दाखवण्याच्या लायकीच्या चित्रपटांचे संरक्षण केले पाहिजे. व्यक्तिगत स्तरावर पाहण्यासाठी विषय-सामग्री ही अश्लील बनवणे आणि कलेचे प्रदर्शन करणे अत्यंत सोपे झाले आहे. मात्र याच्या तुलनेत प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करणे फार कठीण झाले आहे. हे सर्व स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म काह नाही तर पॉर्न हब झाले आहे. लज्जास्पद.

कंगना हिने आणखी एका ट्विट मध्ये असे ही म्हटले की, ही फक्त स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मची चूकी नाही तर जेव्हा तुम्ही एकटे बसून, कानात हेडफोन टाकून एखादा कंटेट पाहता त्यावेळी तुम्हाला तत्काळ संतुष्टी हवी असते. चित्रपट संपूर्ण परिवार, मुले, आजूबाजूचे शेजारी यांच्यासह पाहण्यास जाण्याची आवश्यकता आहे. मूळ रुपात हा एक सामुदायिक अनुभव असला पाहिजे.(बॉलिवूड अभिनेत्री Kangana Ranaut आणि बहिण Rangoli Chandel यांची समस्या वाढली, मुंबईत देशद्रोहच्या विविध कलमाअंतर्गत FIR दाखल)

पुढे असे ही म्हटले की, यामुळे आपली सतर्कता वाढते. आपल्याला माहिती असते की जे आपण पाहतो ते अजून एखादा व्यक्ती सुद्धा पाहत आहे. आपण तेच बनण्याचा प्रयत्न करतो. जे दुसऱ्यांच्या नजरेत स्वत:ला पाहतात. आपण गोष्टींना पाहून सतर्क होते. आपले डोके, भावना आणि आपल्या अंतरआत्म्याला लगाम लावणे गरजेचे आहे.(Mumbai Police Summons Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत व बहिण रंगोली चंदेलला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स; जाणून घ्या काय आहे कारण)

कंगना हिच्या या गोष्टींचे बहुतांश लोकांनी समर्थन केले आहे. सोशल मीडियात युजर्सने मानले की, या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म मुळे भारतीय संस्कृती आणि लोकांच्या भावनेला ठेच पोहचत आहे. सोशल मीडियात लोकांनी एकजुट होत इरॉस यांनी आपले हे पोस्ट डिलिट केले आहे. त्याचसोबत गुरुवारी अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक माफिनामा सुद्धा जाहीर केला आहे.