Boycott Pathan Trends on Twitter: ट्विटरवर शाहरुख खानचा पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी; Deepika Padukone चा लूक व अभिनयावर चाहते नाराज
Besharam Rang Song (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या अनेक महिन्यांपासून शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) दिसणार आहे. आता या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे संपूर्ण गाणे दीपिका पदुकोणच्या 'ग्लॅमरस' दिसण्यावर केंद्रित आहे. गाण्याच्या बहुतांश भागात ती बिकिनीमध्ये दाखवण्यात आली आहे. या गाण्यात दीपिका शाहरुखसोबत बीचवर रोमान्स करताना दिसत आहे. मात्र या गाण्यानंतर ट्विटरवर पठाण चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे गाणे गीतकार कुमार यांनी लिहिले आहे, तर संगीत दिग्दर्शक जोडी विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केले आहे. शिल्पा राव आणि कारलिसा मोंटेरियो यांनी यासाठी आवाज दिला आहे. मात्र गाण्यात दाखवण्यात आलेले सिन्स आणि आउटफिट्सबाबत सोशल मिडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. गाण्यात दीपिकाच्या बिकिनीचा रंग भगवा दाखवला गेला आहे, ज्याला कडाडून विरोध होत आहे. यानंतर आता हा चित्रपटही बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (हेही वाचा: बिकिनी अवतारात काळजाचा ठोका चुकवणारा Sakshi Malik चा घायाळ करणारा अंदाज, पाहा फोटो)

दीपिकाच्या चाहत्यांना या गाण्यातील तिचा लूक व अभिनय अजिबात आवडला नसल्याचे दिसत आहे. दीपिका पदुकोणच्या गाण्यातील लूकवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यूजर्स या गाण्यावर जोरदार टीका करत आहेत, यासह गाण्यातील मुख्य कलाकार शाहरुख आणि दीपिकाला खूप ट्रोल करत आहेत. गाण्यात दाखवण्यात आलेले सीन आणि आउटफिट्स या दोन्हींबाबत यूजर्स खुश नसल्याचे दिसत आहेत. हे गाणे सहकुटुंब पाहता येणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहतेही ट्विटरवर पठाणला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. यशराज बॅनरखाली निर्मित पठाण हा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित असून यामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'पठाण' हा एक अॅक्शन चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे.