Chhapaak Box Office Collection Day 3: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचा (Deepika Padukone) 'छपाक' (Chhapaak) हा बहुचर्चित सिनेमा 10 जानेवारीला देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. परंतु, याच दिवशी बॉलिवूड स्टार अजय देवगण याचा 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे या दोन चित्रपटात जोरदार चुरस पाहायला मिळाली. बॉक्स ऑफिसवर छपाकला तानाजी चित्रपटापेक्षा कमी प्रतिसाद मिळत नाही. परंतु, रविवारी 'छपाक'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या दिवशी 'छपाक'ने 4.77 कोटी, शनिवारी 6. 90 कोटी आणि रविवारी 7.35 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून 'छपाक'ने एकूण 19.02 कोटी रुपयांची कमाई केली आहे, असं तरण आदर्श यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Tanhaji: The Unsung Warrior चित्रपटासाठी अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खानने घेतले 'इतके' मानधन; वाचून तुम्हालाही बसेल धक्का)
#Chhapaak sees day-wise growth, but the weekend trending is good, not great... Collects well at premium multiplexes of urban sectors mainly... Needs to trend well on weekdays for a healthy Week 1 total... Fri 4.77 cr, Sat 6.90 cr, Sun 7.35 cr. Total: ₹ 19.02 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 13, 2020
'छपाक'च्या तुलनेत 'तान्हाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले उत्पन्न कमावले आहे. विशेष म्हणजे रविवारी एकाच दिवसात तान्हाजीच्या उत्पन्नात 30 टक्क्यांची वाढ झाली. या दिवशी तान्हाजी चित्रपटाने 25 ते 26 कोटी रुपये कमाविल्याचे बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. तसेच शुक्रवार ते रविवार या 3 दिवसांत 'तान्हाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 61.65 कोटी रुपये कमावले आहेत.
दीपिकाने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर दीपिकावर काही जणांनी जोरदार टीका केली. तर काहींनी दीपिकाच्या कृतीचे कौतुक केले. त्यामुळे 'छपाक' सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या 'छपाक' सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.