Boman Irani यांच्या आईच्या निधनाने अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, मृत्यूच्या एक दिवस आधी मुलाकडे मागितली होती 'ही' आवडती गोष्ट
Boman Irani Mother Passed Away (Photo Credits: Instagram)

Boman Irani's Mother Passes Away: बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते बोमन इराणी यांच्या मातोश्री Jerbanoo Irani यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मुलगा बोमन इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या आईने झोपेतच अखेरचा श्वास घेतला. त्या 94 वर्षांच्या होत्या. बोमन इराणी यांच्यासाठी त्यांच्या आईचं त्यांचे माता-पिता होते. आपल्या आईच्या अकाली निधनाने बोमन पुर्णपणे कोलमडले आहे. अभिनेत्याने सोशल मिडियावर भावूक पोस्ट लिहून आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. निधनाच्या एक दिवस आधी आपल्या आईने तिची आवडती गोष्ट मागितली होती हेही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे.

बोमन यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या आईचा एक सुंदर फोटो शेअर करुन तिच्याविषयीच्या आठवणी आपल्या चाहत्यांसोहत शेअर केल्या आहेत.हेदेखील वाचा- Sonu Sood ची मोठी घोषणा; देशात 15 ते 18 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्स स्थापन करणार (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Boman Irani (@boman_irani)

लहानपणी त्यांच्या आईने त्यांची कशी काळजी घेतली आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा-अपेक्षा पूर्ण केल्या ते बोमन यांनी सांगितले. त्यांच्या आईला चमचमीत पदार्थ आणि गाणे ऐकणे खूप पसंत होते. त्याचबरोबर त्या इंटरनेटवरही प्रचंड सक्रिय होत्या. असेही ते पुढे म्हणाले.

निधनाच्या एक रात्र आधी त्यांच्या आईने त्यांच्याकडे मलाई आईस्क्रिम आणि आंबा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या आईच्याप्रती प्रेम आणि सम्मान व्यक्त करत त्यांनी आपल्या आईला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बोमन ईराणी यांच्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून रितेश देशमुख, मौनी रॉय, विवेक ओबेरॉय, कीर्ति खरबंदासह अनेक सेलिब्रिटीजनी त्यांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले आहे.