Coronavirus: बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिची पाचवी COVID-19 चाचणी निगेटिव्ह, अजूनही अंतिम रिपोर्ट येणे बाकी
कनिका कपूर (Photo Credits-Twitter)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) हिला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच संपूर्ण सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली. ही बातमी सर्वसामान्यांसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी देखील तितकीच धक्कादायक होती. तिचे आतापर्यंतचे कोरोना चे सर्व रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. मात्र आता तिच्या पाचव्या चाचणीचे रिपोर्टस निगेटिव्ह आले आहेत. ही जरी तिच्या चाहत्यांसाठी आनंदाचाी बातमी असली तरीही तिचा आणखी एक अंतिम रिपोर्टस जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिला लखनौ च्या PGI रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

कनिका कपूर हिचे याआधीचे सर्व कोरोना चाचणी या पॉझिटिव्ह आल्या होत्या. यासंदर्भात संजय गांधी संस्थेचे संचालक आर. के. धीमान यांनी "कोरोना व्हायरसचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले असले तरी कनिकाची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळ काळजीचे काही कारण नाही." असे सांगितले होते. मात्र आता तिचा पाचवा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus: बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिची कोरोना व्हायरस चाचणी चौथ्यांदाही पॉझिटव्हच

लंडनहून परतल्यानंतर कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 9 मार्चला भारतात परतल्यानंतर तिने एका पार्टीला हजेरी लावली होती. त्या पार्टीत तब्बल 100 लोक उपस्थित होते. या पार्टीला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंह आणि उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह हे ही उपस्थित होते. कनिकाचे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर त्यांचीही चाचणी करण्यात आली. मात्र त्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले. तरी देखील त्यांना काही दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कनिका कपूर गेल्या 20 मार्च रोजी पीजीआय रुग्णालयात दाखल झाली होती. कनिका 9 मार्च रोजी लंडन येथून परतली. तिने विमानतळ ते लखनऊ असा प्रवास केला. या काळात तिला खोकला, ताप असा त्रास होऊ लागला. त्यामुळे ती रुग्णालयात दाखल झाली. तिची कोरोना व्हायरस चाचणी केली असता ती पॉझिटव्ह आली. त्यामुळे कनिकाला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे निदान झाले.