बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) याचा आईसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. तर नेटकऱ्यांनी आतापर्यंत हा व्हिडिओ 24 लाख वेळा पाहिला आहे. तर सलमान आणि त्याच्या आईचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून प्रत्येकजण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
सलमान खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, आई सांगत आहे सुरु असलेले हे नाचगाणे बंद करुयात. परंतु सलमान आईसोबत अत्यंत उत्सुकतेने तिच्यासोबत डान्स करताना दिसून येत आहे. तर सलमान खान भारत सिनेमानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियात सक्रिय झाला असल्याचे दिसून येत आहे. तर आईसोबतच्या डान्सचा व्हिडिओ पोस्ट करताच अवघ्या 4 तासात 24 लाख लोकांनी तो पाहिला आहे.
(खास संदेशासह सलमान खान याचे हटके Bottle Cap Challenge; पहा व्हिडिओ)
दोन दिवसांपूर्वी सलमान खान जुन्या काळातील पत्र चिटकवण्यासाठी जी पद्धत वापरली जात असे त्याचा उपयोग करताना दिसून आला. त्यामध्ये तो तोंडाच्या थुंकीने एक लिफाफा चिटकवत असल्याचे दिसून आले होते. तसेच सोशल मीडियात व्हायरल झालेल्या बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओतून एक खास संदेश चाहत्यांना देताना दिसून आला.