खास संदेशासह सलमान खान याचे हटके Bottle Cap Challenge; पहा व्हिडिओ
Salman Khan's Bottle Cap Challenge (Photo Credits: Instagram)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉटल कॅप चॅलेंज (Bottle Cap Challenge) चांगलंच रंगत आहे. अनेक सेलिब्रेटी हे चॅलेंज स्वीकारुन याचे व्हिडिओज सोशल माध्यमात शेअर करत आहे. यात दबंग खान सलमान खान (Salman Khan) देखील मागे राहिला नाही. बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ शेअर करत त्याने खास संदेशही दिला आहे.

सलमान खान याने बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून त्यात तो पायाने नाही हाताने नाही तर हटके पद्धतीने बाटलीचे झाकण काढताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत सलमान खानने पाणी वाचवण्याचा खास संदेशही दिला आहे.

पहा व्हिडिओ:

 

 

View this post on Instagram

 

Don’t thakao paani bachao

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

यापूर्वी अक्षय कुमार, सिद्धार्थ चतुर्वेदी, टायगर श्रॉफ, कुणाल खेमू, अभिनेत्री सुष्मिता सेन यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनी बॉटल कॅप चॅलेंज स्वीकारुन व्हिडिओ शेअर केले आहेत.

आपल्या सिनेमांसोबतच सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील अभिनेता सलमान खान चर्चेत असतो. सलमानच्या 'भारत' सिनेमाने दमदार कमाई केली असून लवकरच सलमान 'दबंग 3' आणि 'इंशाअल्लाह' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.