अक्षय कुमार याने पूर्ण केले जेसन स्टेथम चे Bottle Cap Challenge; पहा व्हिडिओ
Akshay Kumar's Bottle Cap Challenge (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने जेसन स्टेथम (Jason Sthatham) याचे बॉटल कॅप चॅलेंज (Bottle Cap Challenge) पूर्ण करत सर्वांनाच थक्क केले आहे. इंग्लिश अभिनेता जेसन स्टेथम याने सोशल मीडियावर एक मजेशीर चॅलेंज सुरु केले होते. त्यात तो एका जबरदस्त अॅक्शनसह पायाने बॉटलचे झाकण उघडतो. हा व्हिडिओ जेसनने सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना हे चॅलेंज पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. (अॅक्शन सीन संपताच अक्षय कुमार ने आपल्या प्रशिक्षकावर रोखली बंदूक, पाहा मजेशीर फोटो)

बॉलिवूडच्या अॅक्शन हिरोने म्हणजेच अक्षय कुमार ने हे चॅलेंज अगदी लिलया पूर्ण केले आहे. अक्षय कुमारने चॅलेंज पूर्ण केल्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "बॉटल कॅप चॅलेंज पासून मी स्वत: रोखू शकलो नाही. अॅक्शन आयडल असलेल्या जेसन स्टेथम पासून प्रेरित. सर्वात उत्तम चॅलेंज व्हिडिओला मी रिपोस्ट किंवा रिट्विट करेन. तर तुम्ही देखील हे करुन पहा." #फिटइंडिया #वेडनेसडेमोटिवेशन

पहा व्हिडिओ:

अक्षय कुमारच्या या व्हिडिओने चाहत्यांपासून सर्वचजण थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 14 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

अक्षय कुमार लवकरच 'हाऊसफुल 4' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर करीना कपूरसोबत त्याचा 'गुड न्यूज' सिनेमावरही काम सुरु आहे. त्याचबरोबर त्याच्या 'लक्ष्मी बम' आणि 'सूर्यवंशी' या सिनेमांचीही चर्चा आहे.